दिव्यांग असूनही “तो” गाजवितो पत्रकारिता क्षेत्र
____________________________
गेवराई : खऱ्या अर्थाने पत्रकार हा समाज जीवनाचा आरसा असतो. समाजामध्ये काय घडत आहे? याचा वास्तवदर्शी चित्रण करणारा पत्रकार असतो आणि भारतीय संविधानाप्रमाणे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजेच पत्रकार आहे.
पत्रकार म्हटल्यानंतर पत्रकार हा तार्किक विचार करणारा असावा लागतो व तसेच शोध घेणारी होती त्याच्यामुळे असायला पाहिजे म्हणजे एखादी घटना का घडली? वरती घटना घडल्यानंतर समाजावर त्याचे काय परिणाम होतील याचा विवेक बुद्धीने तर्क लावणारा पत्रकार असायला हवा. आपल्या अवतीभोवती काय सुरू आहे याची पक्की व खरोखर माहिती पत्रकारामुळेच कळते.
मी जवळपास एक वर्षापासून साहित्य क्षेत्रात माझा लिखाण करीत आहे आणि माझ्या कविता किंवा लेख प्रसारित करण्याकरिता मी काही पत्रकारांशी संवाद साधला सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातून आपलं लिखाण जनतेपर्यंत पोहोचावं या हेतूने त्यांच्या दैनिकांमध्ये स्वलिखित कविता किंवा लेख प्रसारित करायला लागलो.
आणि अशातच बीड जिल्ह्यातील एका पत्रकाराची माझी ओळख झाली त्यांचं नाव म्हणजे नवनाथ आडे सर. हे अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना बीड जिल्ह्यामध्ये ओळखला जातो आणि निर्भीड पत्रकार म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख केला जातो.
पत्रकार असावा तर नवनाथ आणि सरांसारखा निर्भिड, चौकस बुद्धी असणारा एका घटनेच्या चारही बाजूने विचार करणारा असा असायला हवा आणि जेव्हापासून मी यांच्या संपर्कामध्ये आलो तेव्हापासून ते आत्तापर्यंत रोज त्यांच्या कामगिरीच्या बातम्या मी वाचत आलो आहे आणि वाचल्यानंतर एक धाडसी आणि निर्भीड नेतृत्व पत्रकरिता क्षेत्रांमध्ये कार्य करीत आहे याचा मला अभिमान वाटला.
आणि विशेषता ते दिव्यांग आहेत. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की जरी मी दिव्यांग शारीरिक अवयवाने असो परंतु माझी बुद्धीही दिव्यांग नाही आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी ठरवता की तुमच्या कमजोरी ला ताकद बनवायचे आहे तेव्हा तुमच्यासाठी काहीही अशक्य नसतं त्याच्या इच्छेप्रमाणे अभिमानास्पद कार्य ते करू शकतात आणि याचा प्रत्यय मला सर यांच्याशी संपर्क झाल्याने अनुभवायला आले.
जरी ते दिव्यांग असेल तरी त्याला गावातील जनतेचा प्रेम इतकं मिळतं की दिव्यांग असल्याची जाणीव त्यांना होतच नाही. व राजकीय नेत्यांकडूनही त्यांच्या या धाडसी नेतृत्वाचे नेहमी कौतुक होत असते.
निर्भीड म्हटल्यानंतर तो कुठल्याही प्रकारे भीती न बाळगता आपल्या जिवाचे परवाना करतात खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे ठरवण्याचे सामर्थ्य त्या निर्भीड पत्रकारांमध्ये असते आणि असेच नवनाथ आणि पत्रकार आहेत. अन्यायाविरुद्ध न डगमगता कशाचेही परवाना करतात आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढतात.
कर्तृत्व, नेतृत्व, आणि वक्तृत्व ह्या तीन गोष्टी जर पत्रकाराकडे असेल तर तो नक्कीच समाजाला एक नवी दिशा देईल असे मला मला वाटते. आणि हे तीनही गुण नवनाथ आडे यांच्याकडे आहेत. आणि या गुणाच्या आधारावरच ते पत्रकारिता क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. अशाप्रकारे सतत जनसेवेसाठी धडपडणारे, व भ्रष्टाचारांची झोप उडविणारे, एक निर्भीड पत्रकार म्हणजे नवनाथ आडे.
त्यांच्यासाठी मला म्हणावसं वाटतं की,
स्वतःच्या जीवावर खेळून
अन्यायाविरुद्ध लढता तुम्ही
स्वतःच्या लेखणीच्या माध्यमातून
समाज भ्रष्ट मुक्त करता तुम्ही
– स्वप्निल गोरे