ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेली गाडी चर्चेचा विषय,लग्झरी एसयूव्हीमध्ये काय खास आहे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा’ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची देखील माहिती दिली
मात्र, दौऱ्यादरम्यान स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेली गाडी चर्चेचा विषय ठरला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीच स्टेअरिंग स्वतः फडणवीसांनी हाती घेतल्याने याची विशेष चर्चा सुरू आहे. या दौऱ्याचे त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चालवलेली गाडी देखील लाखमोलाची आहे. देवेंद्र फडणवीस हे Mercedes-Benz G350d चालवताना दिसत आहेत. फडणवीसांनी स्वतः जवळपास ५०० किमी गाडी चालवली. Mercedes-Benz G350d या लग्झरी एसयूव्हीमध्ये काय खास आहेत, ते जाणून घेऊया.
पॉवरफुल इंजिनसह येते Mercedes-Benz G350d

Mercedes-Benz G350d एसयूव्ही पॉवरफुल इंजिनसह येते. यामध्ये ३.० लिटरचे ६ सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ९-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. इंजिन १२००-३२०० आरपीएमवर ६००एनएम टॉर्क आणि ३४००-४६०० आरपीएमएवर २८१.६ पॉवर जनरेट करते. विशेष म्हणजे ही एसयूव्ही अवघ्या ७.४ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडू शकते. तर याचा बूट स्पेस ४८० लीटर आहे.

एसयूव्हीमध्ये थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, ९ एअरबॅग्ज, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यासारखे अनेक शानदार फीचर्स देखील पाहायला मिळतील. एसयूव्हीमध्ये ५ जण सहज बसू शकतात. यात १२.३ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. यात तुम्हाला Android Auto, Apple CarPlay ची देखील सुविधा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी इतरही अनेक फीचर्स दिले आहेत.
Mercedes-Benz G350d एसयूव्हीची किंमत देखील जास्त आहे. मर्सिडीजच्या या लग्झरी एसयूव्हीची ऑन रोड किंमत जवळपास २.६ कोटी रुपये आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *