क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषणासाठी बसलेला आदिवासी बांधव आप्पा पवार याचा मृत्यू


 

शासनाच्या लालफितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असतं याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार की प्रशासन आणि त्यांची दिरंगाई ? याची चौकशी होणे आता गरजेचे असल्याचा सवाल नागरिकांनी केला आहे.

बीड : बीड येथील आप्पाराव भुजाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी आदिवासी बांधव आप्पा पवार याला शासनाचे घरकुल मंजूर झाले असल्यामुळे त्यांनी घराचे काम पण चालू केले होते. तीन हप्ते जमाही झाले परंतु घराचे काम पूर्ण होऊनही चौथा हप्ता मिळावा म्हणून ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे अनेक वेळी गेला होता.प्रस्थापित पुढाऱ्यांना ही भेटला होता परंतु न्याय कुठेच मिळाला नाही.

म्हणून घरकुलाचा चौथा हप्ता मिळावा म्हणून बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषणासाठी आप्पा पवार बसले होते त्यांच्याकडे कोणत्याच पुढाऱ्याचे अधिकाऱ्याचे व शासनाचे लक्ष गेलं नाही या शासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी बांधव आप्पा पवार यांचे थंडीत मंजूर झालेल्या घरकुलांचे हप्ते मिळावे म्हणून शासन दरबारी स्वतःचा जीव गमवावा लागला.

बीड जिल्ह्यातील पुढारी व प्रस्थापितांनी गोरगरीब आदिवासी जनतेचा कधीच विचार केला नाही गायरान जमीन मिळू दिली नाही नाव फक्त गोरगरिबांचे आणि लूट प्रस्थापिताची गोरगरिबांचा विचार केला जातो फक्त मतदानासाठी

स्वतःच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषणासाठी बसलेला आदिवासी बांधव आप्पा पवार याचा मृत्यू झाला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *