प्रेम उठाव
पुस्तक परीक्षण लेखिका -: सौ. सुमेधा शितल प्रसाद दिवाण, सांगली.
प्रेम हे सर्व चरा चरात आहे. प्रेम उठाव या कवितासंग्रहातील कविता वाचताना, नवं युवक पासून आई, धरती माता वर ही कवी नवनाथ रणखांबे यांनी प्रेम व्यक्त केले आहे.
सुख, दुःख, अबोला, वेदना, ताटातूट, विरह, मिलन या विविध भावना कवीने योग्य शब्दात कवितेतून व्यक्त केल्या आहेत. कविता ही सहजा सहजी होत नसून अनुभूती शिवाय कवितेची निर्मिती होत नाही म्हणून
कवी थेंब या कवितेत म्हणतात, —-
‘ दुःखाचा समुद्र
डोळ्यात दाटल्यावर
टपटपतात टपोरे थेंब
कविता होऊन कागदावर’
( कविता थेंब / पान नंबर ४७)
नवनाथ रणखांबे यांनी कविता संग्रहाला प्रेमाची कविता असे न म्हणता, ‘ प्रेम उठाव’ असे म्हटले आहे कारण ‘प्रेम उठाव’ हा शब्द धाडस आणि धैर्य दाखवते. प्रेमात कवितेने केलेला हा उठाव प्रेम उठाव या कविता संग्रहातून व्यक्त होत जातो. दुःखाच्या समुद्रात बुडलेला कवी म्हणतो, —–
‘यातनांनी घेतलेली बात होती
रोज आता आसवांची रात होती’
( गझल राहिली हृदयात / पान नंबर 30)
या गझले बरोबरच वेदनेचे डंख आणि अनुभूतीचे पंख कवीला स्वस्थ बसू देत नाहीत त्याचीच कविता होते .
ते म्हणतात –
‘ वेदनेचे डंख आहेत
अनुभूतीचे पंख आहेत
मला झाकता येत नाहीत
आन मिरवता येत नाहीत’
( कविता अस्वस्थ / पान नंबर 32)
उठाव या कवीतेत कवी म्हणतो , —
‘ हा समतेचा उठाव आहे…
इडा पिडा जाऊ दे
अणि समतेचे युग येऊ दे ! ‘
( कविता उठाव / पान नंबर 35)
समाजातील विषमतेची दुरी दूर व्हावी . समाजमध्ये समतेचे युग यावे असा आशावाद ही ते सदरहू कवितेत सांगतात. आईने कष्ट करून स्वप्नं फुलवलेली व्यक्त करताना
आईच्या प्रेमाविषयी व्यक्त होताना
माय कवितेतून पुढीलप्रमाणे सहज कवी व्यक्त होतो —
खंबीर लढताना माय
तुला मी पाहिलंय माय
तुला मी पाहिलंय माय
स्वप्न फुलंवताना माय
तुझ्या मोळीच्या माराला
तुझ्या डोळ्यातल्या रागाला
धार स्नेहाची संघर्षाला
होती भरल्या हृदयाला
( कविता आभाळ होताना माय / पान नंबर 45 )
तर भारत हा जागतिक महासत्ता व्हावा . प्रगतशील राष्ट्रामध्ये देशाचे नाव यावे . देशाचा सर्वांगीण विकास व्हावा. देशातील विषमता दूर व्हावी म्हणून देश प्रेमावर आधारित भारत मातेबद्दल कवी बोलतात..
‘सुजलाम सुफलाम करु चला
देश प्रगतीवर नेऊ चला //’
( कविता सुजलाम सुफलाम / पान नंबर 61) अश्या आशावादी, ध्येयवादी थोर कवी श्री. नवनाथ रणखांबे यांच्याकडून पुढे अनेक उठाव घडतील. माझ्या सारख्या काव्यरासिकांना आस्वाद देतील या साठी खुप खुप शुभेच्छा आणि अनेक काव्यसंग्रह असेच लिहून होतील अशी मंगल कामना व्यक्त करते.
पुस्तक -: प्रेम उठाव
कवी -: नवनाथ रणखांबे
प्रकाशन -: शारदा प्रकाशन ठाणे
पुस्तक परीक्षण लेखिका -: सौ. सुमेधा शितल प्रसाद दिवाण सांगली