ऊस दराच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऊस दराचा प्रश्न सुटावा यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीच्या आयोजन केलेले होते. परंतु या बैठकीमध्ये जिल्हाधिकारीच उशिरा पोहोचल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतीत निषेध व्यक्त करीत बैठकीवर बहिष्कार टाकला होता.
परंतु नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने उपस्थित कारखान्यांचे प्रतिनिधी व बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ऊसदराच्या बाबतीत असलेली कोंडी फोडण्यात आली. यामध्ये कृष्णा कारखान्याने पहिली उचल एक रकमी 3000 व जयवंत शुगरने पहिली उचल 2951 रुपये जाहीर केली. ऊस दराची कोंडी सुटावी यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठकीच्या आयोजन केले होते.
बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधी व सर्व पक्षाच्या शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी यांना बैठकीसाठी निमंत्रण दिले होते. परंतु या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उशिरा पोहोचल्याने बैठक वेळेवर सुरू झाले नाही व त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत निषेध नोंदविला.
परंतु नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आल्यानंतर उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली व बैठक सुरू झाली. या बैठकीत उपस्थित कारखान्याच्या प्रतिनिधींनी आपापल्या कारखान्याची एकरक्कमी दर जाहीर केले. नक्की कोणत्या कारखान्याने किती दर जाहीर केले ते पाहू.
कारखान्यांनी जाहीर केलेली पहिली उचल
यामध्ये जयवंत शुगर ने 2951 रुपये पहिली उचल जाहीर केली. त्यानंतर श्रीराम जव्हार 2721 रुपये, शरयू दत्त इंडिया 2700, सह्याद्री 2375 रुपये, बाळासाहेब देसाई कारखाना 2318 रुपये, अजिंक्यतारा कारखाना 2290 रुपये, मान खटाव 2700 रुपये, कृष्णा कारखाना तीन हजार रुपये, जरंडेश्वर 2273 रुपये, किसनवीर 2350 रुपये, खंडाळा 2380 रुपये आणि वर्धनगड ऍग्रो 2700 रुपये अशाप्रकारे कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली.