बंगळूर : अधिकाऱ्यांवरील राग ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदारांवर (MLA) काढला आहे.
जंगली प्राण्यांच्या त्रासाबद्दल वारंवार सांगूनही उपाय योजना होत नसल्याने चौकशीसाठी आलेल्या भाजपच्या आमदाराला ग्रामस्थांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. ही घटना कर्नाटकच्या (Karnataka) चिकमंगळूरच्या मुडिगेरे येथे घडली आहे. (Citizens beat BJP MLA till his clothes were torn)
हा प्रकार मुडिगेरेचे भाजप आमदार एम. पी. कुमारस्वामी यांच्याबाबत घडला आहे. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात शोभा या ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. आमदार कुमारस्वामी हे त्या महिलेचा मृतदेह पाहणीसाठी आणि कुटुंबीयांना धीर देण्यासाठी गेले होते. त्यावेळी नागरिकारंनी आमदार एम. पी. कुमारस्वामी यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्यात नागरिकांनी आमदारांना बेदम मारहाण केली असून त्यांचे कपडेही फाडले आहेत. याशिवाय, महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांविरोधात महिलेच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
शोभा यांचा मृतदेह पाहण्यासाठी मुडिगेरेचे आमदार एम. पी. कुमारस्वामी आले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. अधिकाऱ्यांच्या विरोधात जनतेत रोष असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पिकांच्या नुकसानीबाबत वारंवार तक्रारी करूनही जिल्हाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांना शांत करण्यासाठी कुमारस्वामी हे त्या गावात गेले होते. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्याचा शर्ट फाडला. काही ग्रामस्थांनी आमदाराच्या बचावासाठी धाव घेतली
दरम्यान, ग्रामस्थांच्या वागणुकीवर आमदार कुमारस्वामी यांनी टीका केली आहे. घराजवळील शेतात गवत कापत असताना शोभा यांचा रानडुकरांच्या हल्यात मृत्यू झाला होता. ही घटना घडली तेव्हा तिचा पती सतीश गौडा तिच्या जवळ होता. या जोडप्याला २० वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, या भागात हत्तींचा वावर वाढला असून शेतकरी शेतात काम करण्यास घाबरत आहे, असेही संतप्त नागरिकांनी सांगितले. या भागात हत्ती पिकांचे नुकसान करून माणसांवर हल्ला करत आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत हत्तींच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या