कांदा पिक खरीप हंगामामधील कांद्याचे देखील अतिवृष्टीमुळे फार मोठा फटका बसला असून प्रमुख कांदापट्ट्यांमध्ये परतीच्या पावसाने खूप मोठ्या प्रमाणात खरीप लाल कांद्याचे नुकसान केले आहे. तसेच मागच्या वर्षाचा उन्हाळी कांदा जो काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला होता तो देखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे कांद्याचा एकूणच पुरवठा हा मागणीपेक्षा खूपच कमी झाल्याने मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये मागील काही दिवसांपासून दिलासादायक अशी दर वाढ होताना दिसून येत होती. प
रंतु जर सध्याची परिस्थिती पाहिली तर कांद्याची परिस्थिती अतिशय दयनीय बनले आहे. जर आपण मागील काही दिवसांपासून विचार केला तर कांद्याला चांगला बाजार भाव मिळताना दिसून येत होता. परंतु जर आजचा विचार केला तर कांद्याचे प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात आज मोठी घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली.
नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीतील कांदादराची परिस्थिती
नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये आज कांद्याचे दर गडगडले असून मागच्या आठवड्यात कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2500 रुपये इतका दर मिळत होता परंतु आज त्यामध्ये तब्बल 1300 ते 1500 रुपयांपर्यंत घसरण होऊन कांद्याला सरासरी 1000 ते 1200 रुपये इतकाच भाव मिळत आहे.
कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी संतप्त झाले व त्यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कांद्याला कमीत कमी 30 रुपये भाव देण्याची मागणी केली.
नाहीतर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. भावात घसरण झाल्याच्या मागे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले असून मागणीच्या मानाने आवक जास्त झाली असल्याने ही घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या