कड्याच्या बंधाऱ्याची पाणी गळती थांबवली,रहेमान सय्यद यांच्या प्रयत्नाला यश
कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथिल बंधाऱ्याच्या दरवाज्याची दुरुस्ती करावी व होणारी पाणी गळती थांबवावी म्हणून शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रहेमान सय्यद यांनी तहसिलदार,जलसंधारण अधिकारी आष्टी यांना १२ आँक्टोबर २०२२ रोजी निवेदन व स्मरण पत्र ९ नोव्हेंबर २०२२ रोजी निवेदन दिले होते.त्या निवेदन पत्राची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी गळती थांबवावी म्हणून दोन दिवसांपासून काम सुरू केले होते. कडा बंधाऱ्याच्या दरवाज्यातून होणारी पाणी गळती टक्केवारीत म्हटलं तर होणारी पाणी गळती १००% होती ती आज २०% होत आहे. म्हणजे ८०% पाणी गळती थांबवण्यासाठी काम झालं आहे. हि पाणी गळती थांबवावी म्हणून शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रहेमान सय्यद यांनी महिन्याभरापासून केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे यश आहे.यश मिळाले असले तरी कडा ग्रामस्थ,शेतकऱ्यांना दरवर्षी हि होणारी पाणी गळतीचे गांभीर्य नाही.पाणी गळती थांबवावी म्हणून सर्वांनी साथ दिली असती तर आज होणारी २०%पाणी गळती हि झाली नसती व संपूर्ण पाणी गळती १००% थांबली असती अशी खंत रहेमान सय्यद यांनी यावेळी व्यक्त केली.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या