काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
राहुल गांधी यांच्या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अशातच २०१९ ला जोड्याने मारु म्हणणारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सावरकरांचा अपमान पाहात ठाकरे यांनी तलवार म्यान का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा २०१९ चा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये १८ सप्टेंबर २०१९ ला विधानसभेचा प्रचार करताना उद्धव ठाकरे यांनी ‘राहुल गांधी समोर दिसले तर त्यांना जोडे मारले पाहिजे’. असं म्हटले होते. आज जर त्यांच्यासमोर राहुल आले तर ते २०१९ च्या विधानावर ठाम राहतील का? असा प्रश्न हिंदूत्वावादी संघटना विचारत आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज १० स्मृतीदिन आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्यासंदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हटले आहे उद्धव ठाकरेंनी?
राहुल गांधी काय म्हणाले?
सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधींवर परखड भाषेत टीका केली होती.
सावरकरांविरोधातील वक्तव्यानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे सडकून टीका केली आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवा अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सावरकरांइतके दुसऱ्या कोणत्याही नेत्याने अत्याचार भोगले नाहीत. हिंदू समाज एकत्र आणण्याचं काम सावरकर यांनी केलं. जोपर्यंत हिंदू समाज एकत्र होता तोपर्यंत मजबूत होता. हिंदुत्व हीच जीवनपद्धत आहे. हाच सावरकरांचा वारसा बाळासाहेबांनी चालवला, मात्र आता आदित्य ठाकरे हे सावकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत. असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या