राज्यातल्या एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत आहेत, यादरम्यान आज राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे.
शिंदे-भाजप सरकारने हा निर्णय घेतला असून राज्य सरकारने एसटी महामंडळाला याबद्दलचे पत्र पाठवले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ३४ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मागील काही काळापासून रखडला होता. या प्रस्तावित भत्त्यावर निर्णय होत नसल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या तसेच त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता असून, एसटी कर्मचाऱ्यां मात्र २८ टक्के भत्त्यावर समाधान मानावे लागत होते. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या