मांडला येथे जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरी
मांडला येथे जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरी
स्थानिक मांडला येथे आज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी क्रांतीसुर्य जननायक धरती आबा बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्य मांडला गावातून आदिवासी वाद्यांच्या समवेत आदिवासी पोशाखामध्ये युवक-युवती यांनी बिरसा मुंडा यांची प्रतिमा घेवून प्रभात फेरी काढली. यामध्ये संपूर्ण गावातील लोकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर अभिवादन पर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित सरपंच सुरेंद्रभाऊ धुर्वे यांनी अध्यक्षीय स्थान भूषवले.प्रमुख अतिथी म्हणून मा. सुरेशजी भिवगडे (ग्रंथपाल सिद्धार्थ वाचनालय आर्वी), विशेष अतिथी म्हणून .दीपकभाऊ मडावी ( सचिव,आदिवासी बहुउद्देशीय शिक्षण व विकास संस्था)मुख्य वक्ते म्हणून मा. मोहन कुंभरे (वाणिज्य विभाग,प्रमुख कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,आर्वी) मा. बंशी परतेकी सर (आर्वी तालुका समन्वयक, बार्टी,पुणे) मा..दीपक ईरपतकर सर, मा. सागर ढाकूलकर (पोलीस पाटील मांडला) ग्रामपंचायत सदस्य सौ.रेखाताई कंगाली, सौ.नीलिमाताई मसराम ,सौ वैशालीताई परतेती , .टाके सर (मुख्याध्यापक जि.प. प्राथमिक शाळा मांडला) मारोतराव कौरती, भास्करराव दुबळे सुरेशराव कंगाली व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी यावेळी प्रमुख वक्ते कुंभरे सर यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजासाठी क्रांती घडवून आणण्यासाठी शैक्षणिक प्रगती करावी हेच क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन ठरेल असे मत व्यक्त केले.त्याचप्रमाणे बन्सी परतेकी सर यांनी आदिवासीच्या संस्कृतीवर,बिरसा मुंडांच्या चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुरेश भिवगडे यांनी आणि आदिवासी समाजाने शिक्षण घेऊन आपले नव साहित्य निर्मितीवर भर द्यावा आणि त्यातून जगाला आपली ओळख करून द्यावी असे प्रतिपादन केले. माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र भाऊ धुर्वे यांनी समस्त गावकऱ्यांना बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक लाहोटी यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक अमर काशिनाथ भोगे व आभार सागर ढाकुलकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर लगेच संपूर्ण गावकऱ्यांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम ‘धरती आबा बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीच्या’वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता किशोर परतेती,अरूण खंडाते,पंकज परतेती,हेमंत आत्राम,संदेश ऊईके,उमेश परतेती,रितेश ऊईके,प्रशांत धुर्वे, विनोद परतेती,प्रशांत मसराम,गजानन मसराम,विक्की खंडाते,काशोर ऊईके,कुंजन मसराम,अजय परतेती,राहुल ऊईके,हर्षल कंगाली,सौ.वर्षाबाई आत्राम,सौ.सरलाबाई मसराम,सौ.रुख्माबाई इरपाचे,सौ.रंजनाबाई गेडाम, श्रीमती अलोकाबाई धुर्वे,सौ.निलिमाबाई ऊईके,सौ.सुभद्राबाई परतेती,सौ.कुसूमबाई आत्राम,सौ.पूष्पाबाई कंगाली,सौ.वंदनाबाई तायडे, निखिल ऊईके,महेश परतेती,बंटी भोगे,ईश्वर शिंदे,गोपाल कळसकर,प्रतिक ठोंबरे,अक्षय ढाकुलकर,ओम राऊत,गौरव कंगाली,इत्यादींनी सहकार्य केले. मांडला गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.