सूर्यग्रहण (Solar Eclipse) नंतर आज वर्षातल्या शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) दिसणार आहे. 25 ऑक्टोबर रोजी देशात बहुतांश ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले.
तर, आज देशातील अनेक ठिकाणी वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण दिसणार आहेत. ज्योतिष शास्त्रज्ञांच्या मते, 15 दिवसांच्या आत दोन ग्रहण लागणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) कधी आणि कुठे दिसेल
आज 8 नोव्हेंबर रोजी दिसणारे हे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका येथील काही भागात देखील दिसले. अरुणाचल प्रदेशात चंद्र उगवताना खग्रास स्थिती असेल पण चंद्र क्षितिजावर असल्याने ते पाहता येणार नाही. दरम्यान, उर्वरित भारतामध्ये हे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. भारतीय वेळेनुसार आज दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. तर, 2 वाजून 39 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरुवात होईल. त्याचबरोबर 3 वाजून 46 मिनिटांनी खग्रास ग्रहणाला सुरुवात होईल तर 5 वाजून 11 मिनिटांनी खग्रास ग्रहण संपेल.
भारतातील अरुणाचल प्रदेशात पहिले पूर्ण चंद्रग्रहण आज दिसणार आहे. त्याचबरोबर देशाच्या पूर्वेकडील भागात कोलकत्ता, पटना, इटानगर, रांची, कोहिमा, पुरी इत्यादी ठिकाणी संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल. तर देशाच्या उर्वरित भागांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसेल.
आजच्या चंद्रग्रहण चा सुतक कालावधी
चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधीच सुतक कालावधी सुरू होतो. दरम्यान, आज सकाळी 9.21 मिनिटांपासून सुतक कालावधी सुरू झाला आहे. हिंदू मान्यतेनुसार, सुतक कालावधीमध्ये पृथ्वीचे वातावरण दूषित होते त्यामुळे या कालावधीमध्ये कुठलीही शुभ काम करू नये. त्याचबरोबर सुतक काळामध्ये अशोक दोषांपासून सुरक्षित राहण्यासाठी अतिरिक्त काळजी देखील घेणे गरजेचे असते. ग्रहण समाप्त होतात सुतक कालावधी देखील समाप्त होतो.
सुतक कालावधी मध्ये काय करावे ?
मान्यता नुसार, ग्रहण आणि सुतक कालावधीमध्ये देवाची आराधना करून मंत्रोपचार करावा. ग्रहणादरम्यान, तमोमय महाभीम सोमसूर्यविमर्दन। हेमताराप्रदानेन मम शान्तिप्रदो भव॥ या विधुन्तुद नमस्तुभ्यं सिंहिकानन्दनाच्युत। दानेनानेन नागस्य रक्ष मां वेधजाद्भयात्॥२॥ हा मंत्रोच्चार करावा.
त्याचबरोबर सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी मंदिराचे दरवाजे बंद करावे. तर ग्रहण संपल्यानंतर गंगाजलने स्नान करून मंदिर स्वच्छ करावी. त्याचबरोबर सुतक कालावधी संपताच घरामध्ये देखील गंगाजल शिंपडून घर पवित्र करून घ्यावे.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !