क्राईमताज्या बातम्या

पाकिस्तान आणि चीन मिळून एक खतरनाक प्लॅन आखतायत


कोव्हिड 19 (Covid 19) पासून अजूनही नागरिकांना धोका आहे. अशात पाकिस्तान आणि चीन मिळून एक खतरनाक प्लॅन आखतायत. मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानला हाताशी धरून चीनने मोठी लॅब सुरु केल्याचं समजतं.

पाकिस्तानातील राळपिंडीजवळील (Rawalpindi) एका गुप्त जागी बायोव्हेपन्सवर रिसर्च सुरु असल्याचं समजतंय. कुख्यात वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि पाकिस्तान सेनेची रक्षा विज्ञान आणि प्रौद्योगिकी संघटना (DSTO), या संस्था मिळून पाकिस्तानात घातक पॅथोजेन्स म्हणजेच विषाणूंवर शोधकार्य करत असल्याचं बोललं जातंय.

विविध जागतिक रिपोर्टनुसार चीन शेजारी देश पाकिस्तानात कोरोनासारख्या भयंकर व्हायरसवर धोकादायक रिसर्च करत असल्याचं समजतं.

नक्की आहे कुठे ही लॅब?

जिओ पॉलिटिकलच्या माहितीप्रमाणे ही प्रयोगशाळा एक अत्यंत अत्याधुनिक प्रयोगशाळा असल्याचं बोललं जातं. ही BSL – 4 पद्धतीची प्रयोगशाळा आहे. अशा पद्धतीच्या प्रयोगशाळांमध्ये सर्वात धोकादायक आणि झपाट्याने संक्रमित होणाऱ्या विषाणूंवर अध्ययन आणि त्यांच्या विकासावर प्रयोग केले जातात. मीडिया रिपोर्टनुसार ही लॅब रावळपिंडीच्या चाकलाला छावणीमध्ये असल्याचं समजतं, या प्रयोगशाळेचं नेतृत्व दोन स्टार असणारे जनरल करतात. जाणकारांच्या मते BSL – 4 पद्धतीच्या लॅब्सचा वापर संक्रमित होणारे विषाणू किंवा आरोग्यासाठी अत्यंत घातक असणाऱ्या विषाणूचा अभ्यास करण्यासाठी केला जातो.

जाणकार काय सांगतात?

जिओ पॉलिटिकलच्या रिपोर्टनुसार या सर्व घटनाक्रमावर नजर ठेवणाऱ्या सिक्रेट एजंट्स आणि वैज्ञानिक समुदायातील लोकांनी या लॅब बाबत धोक्याचा इशारा दिला आहे. पाकीस्तानचा वापर करून चीनने त्यांच्या प्रयोगशाळांचं एक नेटवर्क आऊटसोर्स केल्याचं बोललं जातंय. यामध्ये सध्याच्या कोव्हिड विषाणूला 100 पट अधिक धोकादायक बनवलं जातंय

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या ! 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *