ताज्या बातम्या

पोलीस भरतीचा मार्ग मोकळा राज्यभरात 18 हजार 331 पोलिसांची भरती होणार होणार


मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारडून काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरतो पोस्टपोन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.

मात्र नक्की कशामुळे ही भरती थांबवण्यात अली आहे याबद्दल काही स्पष्टता नव्हती. मात्र आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यभरात 18 हजार 331 पोलिसांची भरती होणार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसंच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पद्भारतीमध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीची तयारी केली आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

यंदा असलेल्या पोलीस भरतीमध्ये हजारो रिक्त पदे भरण्यात येणार होती. मात्र कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह होतं. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
असे उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. अंतर आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *