बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे. त्याचप्रमाणे अनावधानाने चुकीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाल्याचे प्रकारदेखील काही वेळा घडल्याचं दिसून येतं.
ऑस्ट्रेलियात अशीच एक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीच्या अकाउंटवर अचानक सहा कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. या व्यक्तीनं कोणतीही पडताळणी न करता पैसे खर्च करण्यास सुरुवात केली. पण नंतर न्यायालयाने या व्यक्तीवर बँक फ्रॉडचा ठपका ठेवत त्याला दोषी ठरवलं.
पुढील महिन्यात या व्यक्तीला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी राहणाऱ्या 24 वर्षांच्या अब्देल घडिया नावाच्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये एके दिवशी अचानक सहा कोटी रुपये जमा झाले. अब्देल हा एक रॅपर आहे. एवढी रक्कम पाहून अब्देलला खूप आनंद झाला आणि त्याने ती रक्कम खर्च करण्यास सुरूवात केली.
एका कपलकडून चुकीने हे पैसे अब्देलच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले होते. पण अब्देलने याविषयी संबंधित बँकेला कोणतीही माहिती दिली नाही. हा सर्व प्रकार अब्देलने लपवून ठेवला. एक कपल नवीन घर खरेदी करत होतं आणि त्याचं पेमेंट देण्याची प्रक्रिया सुरू होती.
पण बॅंक डिटेल्स चुकीचे भरले गेल्याने पैसे अब्देलच्या अकाउंट मध्ये जमा झाले. अब्देलच्या लक्षात ही बाब येताच त्याने ती लपवून ठेवली आणि तो ऐषारामात जगू लागला. मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करू लागला. पण ही गोष्ट उघडकीस आली तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली.
`डेली मेल`ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या बुधवारी त्याला सिडनी न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्याला बँक फ्रॉडशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवलं.
अब्देलने पोलिसांना सांगितलं की “मी जेव्हा सकाळी झोपेतून उठलो तेव्हा माझ्या बॅंक अकाउंट मध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी लगेचच वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच कोटी रुपयांचं सोनं खरेदी केलं.
90 हजार रुपयांची शॉपिंग केली. त्यानंतर उरलेले पैसे मी एटीएममधून काढून घेतले.“ याचा अर्थ अब्देलने सर्व पैसे उडवले. न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगण्यात आलं की, एक कपल घर खरेदीच्या शेवटच्या टप्प्यात होते. त्यांना कॉमनवेल्थ बँकेतून पैसे ट्रान्सफर करायचे होते.
परंतु, त्यांच्याकडून चुकीने सहा कोटी 14 लाख रुपये अब्देल घडियाच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले. अब्देलने ही बाब सगळ्यांपासून लपवली आणि पैसे खर्च करण्यास सुरुवात केली. त्याने सोनं, महागडे कपडे, मेकअपचं साहित्य खरेदी केलं. तो लग्झरी पार्ट्यांमध्ये गेला, बारमध्ये जाऊन मजा केली आणि मनसोक्त पैसे उडवले.
मात्र ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली. अब्देलला सिडनी न्यायालयाने बँक फ्रॉड प्रकरणात दोषी ठरवलं असून, त्याला डिसेंबरमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तुमच्यासोबत चुकूनही असा प्रकार घडला तर तातडीने संबंधित बॅंकेशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती द्या. अशा गोष्टी लपवण्याची चूक करू नका.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !