जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने त्या अस्वस्थ आहेत. त्यांचा रक्तदाब देखील कमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
त्यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर लगेच डॉक्टरांचं पथक त्या थांबलेल्या हॉटेलमध्ये दाखल झालंय. सुषमा अंधारे यांनी स्वत: याबाबतची माहिती दिलीय. सुषमा अंधारे यांच्या भाषणासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन सभा घेण्याचं जाहीर केलं होतं. पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
सुषमा अंधारे सध्या जळगावात ठाण मांडून आहेत. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात सुरु असलेली महाप्रबोधन यात्रा जळगावात चांगलाच धुमाकूळ माजवत आहे. या सभेत त्यांची भाषणं प्रचंड गाजत आहेत. या भाषणांमधून त्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका करत आहेत.
सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झालीय. पण त्यांच्या सभेला पोलिसांकडून मनाई करण्यात आली. कारण त्यांची सभा ज्या ठिकाणी होती त्याच परिसरात स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केलाय.
पण तरी सुषमा अंधारे या सभा घेण्यावर ठाम होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवलं होतं. सुषमा यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.
अखेर तणाव वाढत असल्याने सुषमा यांनी मधला मार्ग काढत ऑनलाईन सभा घेण्याचं ठरवलं. या सगळ्या घडामोडींदरम्यान सुषमा यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली.
त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांची शुगर लेव्हल कमी झाली. त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यानंतर डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल झाली.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !