कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
आष्टी : कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1977 या काळात सलग तीन वेळा देशाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा या पदावर पोहोचल्या. त्यांना आयरन लेडी ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते.
31 ऑक्टोबर 2022 लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147 वी जयंती साजरी करण्यात आली. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा करुन सर्वांनी एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ, प्राचार्य साईनाथ मोहळकर,इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.