लग्नाच्या अधिकृत नोंदणीसाठी सिव्हिल रजिस्ट्री अधिकारीही रुग्णालयात पोहोचले. या लग्नसोहळ्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुम्ही तुमच्या लग्नाचा दिवस कधीही विसरणार नाही. त्यामुळे लग्न आणि बाळाच्या जन्माचा आनंद, असे दोन्ही सोहळे तुम्हाला एकत्र साजरे करता येतील. या घटनेनंतर रुग्णालयानेही निवेदन सादर केले. त्यामध्ये म्हटले आहे की, निकोल आणि मार्क या जोडप्याला असे वाटले होते की, बाळाच्या जन्माच्या आधी त्यांचे लग्न होईल, पण बेबी लीके हिची इच्छा वेगळीच होती. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता बाळाचा जन्म झाला. बाळ आणि बाळंतिण दोघेही निरोगी आहेत.
एका जोडप्याने धूमधडाक्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आयुष्यातील या खास दिवसासाठी त्यांनी डेस्टिनेशन वेडिंगही ठरवले होते, मात्र लग्नाच्या दिवशीच दोघांनी ठरवलेला शाही लग्नाचा बेत त्यांना रद्द करावा लागला.
घटना नेदरलँण्टमधील डोड्रेक्ट शहरात घडली आहे. येथे राहणारे निकोल आणि मार्क यांना त्यांचे लग्न धूमधडाक्यात व्हावे असे वाटत होते. यासाठी त्या दोघांनी मिळून लग्नाचा खास बेतही रचला होता, पण लग्नाआधीच वधू गरोदर होती. निकोल आणि मार्कला त्यांना लग्नानंतरच मूल होईल, असे वाटले होते. त्यामुळे या जोडप्याने बाळंतपणाच्या खूप आधीच लग्नाची तारीख निश्चित केली होती. तरीही लग्नाच्याच दिवशी म्हणजे 26 ऑक्टोबरला दुपारी 2च्या सुमारास अचानक मार्कला लेबर पेन सुरू झाल्या. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव ‘लिकी’ ठेवण्यात आले.
जोडप्याने लग्नाच्या ठरवलेल्या तारखेच्या 5 आठवडे आधी मार्कने बाळाला जन्म दिला. त्यामुळे प्रसूतीपूर्व जोडप्याची लग्न करण्याची योजना अयशस्वी झाली, मात्र विशेष म्हणजे यामुळे बाळाला जन्म दिल्यानंतरही निकोल आणि मार्कचे लग्न थांबले नाही. प्रसूतीनंतर डोड्रेक्ट शहरातील अल्बर्ट श्वेत्झर रुग्णालयाच्या प्रार्थना कक्षात त्याच दिवशी दोघांचा विवाह सोहळा पार पडला. बाळाला अचानक जन्म होऊनही या जोडप्याने हॉस्पिटलमध्येच विवाहानिमित्त एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. पाहुण्यांनीही लग्नाच्या सभागृहाऐवजी रुग्णालयात उपस्थिती दर्शवली.