बीड जिल्ह्यात शिवसेनेची पहिला शाखा दणक्यात स्थापन झाली, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या उपस्थितीत शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या शाखेचे मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले.
शाखा उद्घाटनाला शिवसैनिकांचा उत्साह प्रचंड होता, उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले शिवसेना अभेद्य आहे, अभेद्य राहील, संपतील ते ते गद्दार, असे ते म्हणाले.
बीड जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे प्रचंड उत्साहात आणि दणक्यात उद्घाटन झाले. बीड तालुक्यातील सोनपेठवाडी या गावात शाखा उद्घाटनासाठी सर्व गाव एकत्र आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, बीड तालुकाप्रमुख गोरख सिंघन, शिव अल्पसंख्याक सेना जिल्हा संघटक हुसेन भाई शेख, तालुका संघटक गोरख कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी गावातील सर्व नागरिकांनी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे स्पष्ट केले. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीड जिल्हा शिवसेना तुमच्या सुख दुःखात नेहमी उभी असेल असे आश्वासन दिले. तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार, खासदार, मंत्री सोडून गेले तरी शिवसेना संपणार नाही. उलट शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली तेच संपणार आहेत हाच इतिहास आहे हे नमूद करण्यात आले. या शाखेच्या माध्यमातून गावातील लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शाखेतील पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे ही सांगण्यात आले. सोनपेठवाडीचे सरपंच नवनाथ तोंडे, शाखेचे शाखाप्रमुख म्हणून संदीपान नागरगोजे, उपशहरप्रमुख अशोक भटे, मार्गदर्शक श्रीकांत तोंडे, सचिव संजय भटे, संघटक भीमराव भटे, गटप्रमुख रामनाथ तोंडे, कोषाध्यक्ष रमेश तोंडे, सहकोषाध्यक्ष सुरेश सुरवसे, सल्लागार बाजीराव भटे, बुथप्रमुख नितीन तोंडे, उपसंघटक दगडु भटे, या सर्वांचा बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने हृदयपूर्वक सत्कार करण्यात आला.