शिंदेवस्ति (गारमाळ)ग्रामस्थांचे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी जलसमाधी आंदोलन पुढे काय?
शिंदेवस्ति (गारमाळ)ग्रामस्थांचे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी जलसमाधी आंदोलन ;तहसीलदार रूपाली चौगुले यांनी तराफ्यावरून प्रवास करून शालेय मुली,महिलांच्या व्यथा जाणून घेऊन मागण्या पुर्ण करण्याच्या आश्वासनांतर आंदोलन मागे :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्ति(गारमाळ)येथील शालेय विद्यार्थ्याचे रस्ता नसल्यामुळेच तराफाद्वारे तसेच थर्माकोलवर रामेश्वर साठवण तलावातील पाण्यातुन प्रवास करत सौताडा शाळेत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून संबधित प्रकरणात वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा पाटोदा प्रशासनातील वरिष्ठ आधिका-यांच्या अनास्थेमुळे प्रश्न प्रलंबित पडला असुन संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी त्याच बरोबर तात्काळ रस्त्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१३ ऑक्टोबर रोजी रामेश्वर साठवण तलावात जलसमाधी आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता.तहसिलदार रूपाली चौगुले यांनी तराफ्यावरून प्रवास करून शिंदेवस्तिवरील महिलांच्या समस्या जाणून घेऊन मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी निवेदन तहसीलदार रूपाली चौगुले,गटविकास आधिकारी पंचायत समिती पाटोदा सुमित जाधव, सपोनि आर. एम.पवार,पीएसआय पतंगे,पीएसआय कनके ,गोपनीय शाखेचे तांदळे , शिक्षण विस्तार आधिकारी गव्हाणे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात बाळासाहेब शिंदे,परमेश्वर शिंदे,कैलास शिंदे,नामदेव शिंदे,बापुराव भोरे,तारामती शिंदे,स्वाती भोरे,अश्विनी शिंदे,वच्छलाबाई शिंदे,उषा शिंदे आदि ग्रामस्थ शाळकरी मुलांसहीत हजर होते.
तहसिल कार्यालयातील आढावा बैठकीत आश्वसनाचे पालन न केल्याबद्दल संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करा :- डाॅ.गणेश ढवळे
____
दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी वरील प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जलसमाधी आंदोलन करणेबाबत निवेदन दिल्यानंतर तहसिलदार पाटोदा रूपाली चौगुले यांनी दि.०८ ऑगस्ट २०२२ रोजी तहसिल कार्यालय पाटोदा येथे आढावा बैठक घेतली होती त्यात १) नायब तहसीलदार तथा नगरपंचायत कार्यालय पाटोदा श्री.एस.व्ही. ढाकणे २) पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन पाटोदा श्री. आर.एम.पवार ३)गटविकास आधिकारी पंचायत समिती पाटोदा श्री.सुमीत जाधव ४)उप अभियंता जि.प.बां.उप विभाग पाटोदा श्री.बी. एम.राजपुत ५)मंडळ आधिकारी पाटोदा श्री.एम.एस.बडे ६)डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर निवेदनकर्ते ७)संबधित गावचे आधिकारी दत्ता शिंदे ०८) संबधित गावचे आधिकारी श्री.नामदेव शिंदे उपस्थित होते.
दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजीचे जलसमाधी आंदोलन केवळ पाटोदा तहसिलदार रूपाली चौगुले यांनी आढावा बैठकीत १) गटविकास आधिकारी पंचायत समिती यांच्याकडुन तराफ्यासाठी नियोजन २) शेतक-याने अडवलेला रस्ता २ दिवसात खुला करून देण्यात येईल ३) शिंदेवस्तिवरील नागरीकांना रस्त्याबाबत कायमस्वरूपी समाधानासाठी १५ वा वित्त आयोग,जिल्हापरिषद नियोजन विभाग व आमदार निधीतून अर्थसहाय्य प्राप्त करून सौताडा ते शिंदेवस्तीकडे जाण्यासाठी तलावावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे गटविकास आधिकारी पंचायत समिती पाटोदा यांनी लेखी ठोस आश्वासन दिले होते.
दिलेल्या ठोस आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आले होते. परंतु २ दिवसात रस्ता खुला करून देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर २ महिने होऊन सुद्धा कोणतीही सुधारणा नाही व त्याविषयी निवेदनकर्ते यांना कोणताही पत्रव्यवहार नाही हे एकंदरीतच पाटोदा प्रशासनातील आधिका-यांची अनास्था दर्शविणारे असून संबधित प्रकरणात समाधानकारक उत्तर न दिल्यास संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
शिंदेवस्तिवरील जि.प.शाळेचे पटसंख्या कमी असल्याने समायोजन करण्यात येऊ नये
____
बीड जिल्ह्य़ातील २० पेक्षा कमी पटसंख्या असणा-या शाळांचे समायोजन करण्यात येणार असून त्यासंदर्भात जिल्हापरिषदेतील प्रशासनाने तसेच शिक्षण विभागाने माहिती मागविण्यात आली होती त्यात ७ पटसंख्या असलेल्या शिंदेवस्तीचा समावेश असून दुर्गम भागातील तसेच रस्त्याअभावी मुलांच्या शिक्षणासाठी अडचण येऊन साठवण तलावातुन लहान मुलांचा प्रवास धोकादायक असल्याने त्या शाळेचे समायोजन रद्दबातल करण्यात यावे.
तहसीलदार रूपाली चौगुले तराफ्यावरून प्रवास करत शालेय विद्यार्थी,महिलांच्या व्यथा जाणून मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन
____
तहसीलदार पाटोदा रूपाली चौगुले यांनी गटविकास आधिकारी सुमित जाधव यांच्या समवेत तराफ्यावरून प्रवास करत शिंदेवस्तिवरील महिलांच्या व्यथा जाणत शालेय मुलींशी संवाद साधत लवकरात लवकर मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२