कोट्यावधी रूपयांच्या बीड पंचायत समितीत तंबाखूजन्य पदार्थांचा खुलेआम वापर;आधिका-यांचे दुर्लक्ष तर सीसीटीव्ही नसतेच शोपीस – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
कोट्यावधी रूपयांच्या बीड पंचायत समितीत तंबाखूजन्य पदार्थांचा खुलेआम वापर;आधिका-यांचे दुर्लक्ष तर सीसीटीव्ही नसतेच शोपीस:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
अंदाजे ४ कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या बीड पंचायत समीतीच्या नविन ईमारतीत ७ महिन्यापुर्वी स्थलांतरित झालेल्या सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आले मात्र त्याठिकाणी व्हरांड्यात व झाडांच्या कुंड्यात तंबाखूजन्य पदार्थाचा खुलेआम वापर झाल्याचे निदर्शनास येत असून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ नुसार भारतीय दंड संहिता कलम २६८,२७०,२७२,२७८ नुसार थुंकल्यास ६ महिने ते २ वर्षापर्यंत दंड ठोठावण्याची शिक्षा असताना देखील संबधित प्रकरणात कारवाईकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सीसीटीव्ही शोपीस तर कुंड्यातील झाडे जळुन गेली,सीईओ यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे
___
तंत्रज्ञान पदार्थ संदर्भात दंड विषयक केवळ कागदोपत्रीच असून कारवाई शुन्य असल्यामुळेच व्हरांड्यात सीसीटीव्ही फुटेज केवळ शोपीस तर तंबाखूजन्य पदार्थाचे कव्हर ,पाकीटे झाडे लावलेल्या कुंड्यात आढळुन येतात तर झाडे सुकुन गेलेली आहेत संबधित प्रकरणात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ भादंसं नुसार कारवाई करण्यात यावी अशी तक्रार गटविकास आधिकारी पंचायत समिती बीड यांच्यामार्फत जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड,पोलीस अधीक्षक बीड यांना केली आहे.