तिचं आणि त्याचं साधारण आठ वर्षांपूर्वी लग्न झालेलं. तो एका वेगळ्या शहरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा. तिला आणि त्याला दोन मुलं देखील होती.
पण ते आता एकमेकांसोबत राहत नाहीत. ती तिच्या मुलांसोबत वेगळं राहते आणि तो वेगळा राहतो. तिचा आणि त्याचं नातं, दूध जसं खराब होतं, फाटतं तसं फाटलं आणि त्याच्या आनंदावर विरजण पडलं. याला कारण ठरला त्याच्याच भाऊ. होय दिरामुळे तिच्यात आणि त्याच्यात दुरावा आला. नेमकं त्यांच्यात असं झालं काय? काय झालं ज्यामुळे ते दोघे वेगळे झाले?
नवरा किंवा बायकोच्या अनैतिक संबंधांमुळे नात्यात तणाव निर्माण होतो. असं नातं शेवटी डायव्होर्सपर्यंत जातं अशा अनेक घटना आपल्यासमोर आल्या आहेत. कदाचित सुरुवातील तुम्हालाही ही तशीच बातमी वाटली असेल. मात्र, ही बातमी जरा वेगळी आहे. कारण या नवऱ्याने त्याच्या बायकोला घटस्फोट दिला नाही. जेंव्हा त्याला आपल्या बायकोच्या आणि त्याच्याच भावाच्या अनैतिक संबंधांबाबत माहिती मिळाली, तेंव्हा त्याने बायकोसमोर दोन अटी ठेवल्या. या अटी काहीशा विचित्र होत्या.
ही महिला आपल्या नवऱ्याला सोडून गेली. ती आणि तिचा दीर पळून गेलेत. जेंव्हा तिच्या नवऱ्याला याबाबत सर्व माहिती मिळाली तेंव्हा त्याने या दोघांच्या नात्यावर आक्षेप घेतला. खरंतर ती आणि तिचा दीर लहान नव्हते. त्यामुळे हे सर्व प्रकरण थेट पोहोचलं पोलीस स्टेशनमध्ये. पोलिसांच्या समोर सोक्षमोक्ष लावायची वेळ आली. पोलिसांनी दोन्ही बाजुंना त्यांना नेमकं काय हवं आहे, हे विचारलं. महिलेने पोलिसांसमोर तिच्या दिरासोबतच्या नात्याची कबुली दिली आणि यामुळेच तिला घटस्फोट हवा आहे असं स्पष्टच सांगितलं.
नवऱ्याने दिली दिरासोबत राहण्याची परवानगी पण…
या सर्व प्रकरणानंतर नवऱ्याने एक वेगळीच गुगली टाकली. नवऱ्याने त्याच्या बायकोसमोर दोन अटी ठेवल्या. या अटी जराशा विचित्र होत्या. यातील पहिली अट म्हणजे बायकोला तो घटस्फोट देणार नाही अशी होती. मात्र त्याची बायको त्याच्यापासून लांब राहू शकते असं देखील त्याचं म्हणणं होतं. दुसरी अट म्हणजे तिने पुन्हा कधीच घरी यायचं नाही.
दोन्ही अटीनंतर ती आणि तिचा दीर, तिच्या मुलांसोबत वेगळे राहायला लागले.