आष्टीताज्या बातम्यापरळीबीड जिल्हा

बीड रेल्वे स्थानकाला स्व. गोपिनाथ मुंडे यांचं नाव दया- डॉ. जितीन वंजारे


कमीत-कमी रेल्वे साठी आंदोलनं आणि जेल भोगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावाचे फलक तरी लावा-डॉ. जितीन वंजारे
बीड रेल्वे स्थानकाला स्व. गोपिनाथ मुंडे यांचं नाव दया- डॉ. जितीन वंजारे
बीड  : गेल्या 60 65 वर्षापासून बीडच्या रेल्वेचा प्रलंबित प्रश्न हातामध्ये घेऊन बीड येथील सामाजिक कार्यकर्ते व इतर संघटनाचे विविध नेते आपापल्या परीने सरकार दरबारी आंदोलन निवेदन रास्ता रोको रेल मंत्रालयावर जाऊन दिल्लीला जाऊन जंतर-मंतर येथे आंदोलन करत होती त्या अनुषंगाने रेल्वे कृती समितीची स्थापना सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये झाली होती परंतु रेल्वे कृती समितीच्या एकही सदस्याला निमंत्रण न देता केवल राजकीय स्वार्थापोटी व श्रेयवाद घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी रेल्वेचे काम अर्ध्यावरच असताना जे उद्घाटन केलं त्याला आमचा जाहीर विरोध आहे.बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे येण्यासाठी तिला विविध वेळी विशेष निधी मंजूर करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत त्यातून सर्वांनी मिळून एकत्र येऊन बीड जिल्हा रेल्वे कृती समिती तयार केली होती त्या अंतर्गत रेल्वेसाठी झगडनाऱ्या विविध लोकांना एकत्रित करून या कृती समितीचे काम चालू होतं परंतु ज्यांनी खस्ता खाल्ल्या आंदोलन केली रास्ता रोको केली दिल्लीपर्यंत रेल्वे मंत्रालय असो जंतर-मंतर असो तिथे जाऊन आंदोलन केली अशा लोकांना मात्र बाजूला डावलून राजकीय स्वार्थापोटी जे रेल्वेचे उद्घाटन ज्या ज्या लोकांनी केलं त्यांचा मी माननीय सम्राट डॉक्टर जितिन दादा वंजारे खालापूरीकर जाहीर शब्दात निषेध करतो. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही परंतु सत्ता आली म्हणून ज्यांनी जेल भोगले ज्यांनी आंदोलन केली अशा कार्यकर्त्यांना डावलने ही कुठली राजकीय निती असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि दिल्ली येथे जाऊन रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालयावर आणि जंतर-मंतरवर आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांनी केला.
सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सन्माननीय गंगाधर काळकुटे यांच्या माध्यमातून सतत सात वर्षे दिल्ली येथे रेल्वे मंत्रालय आणि जंतर-मंतर परिसरामध्ये आंदोलन केली यामध्ये मीही रेल्वे आंदोलनासाठी दिल्ली येथे गेलो होतो तेव्हा सहा तासाचं जेल सुद्धा झालं होतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने सर्व आंदोलनकर्त्यांना जामीन मिळाला होता अशा पद्धतीने वेळप्रसंगी जेल भोगणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ज्यांचा रेल्वेसाठी काहीच हातभार लावला नाही अशा लोकांना विशेष निमंत्रण देऊन त्या ठिकाणी उद्घाटन केलं गेलं हे जाणून-बुजून सामाजिक कार्यकर्त्यांना कमी लेखण्याचं षडयंत्र ज्यांनी रचल त्यांची मानसिकता विकृत असुन आता उद्घाटन केलंच आहे तर कमीत कमी रेल्वेसाठी वेळोवेळी लढा उभा करणारे मग ते स्वर्गीय अमोलभैया गलधर यांच्यापासून ते आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची नामसूचीफलक बीड रेल्वे स्टेशन वर लावावीत असा सल्ला यावेळी डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला. तसेच बीड रेल्वे स्थानकाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्यावं आणि रेल्वस्थानकापासून बीड बस स्थानकापर्यंत च्या रोड ला स्वर्गीय अमोल भैया गलधर यांचं नाव द्यावं अशी अपेक्षा बीड रेल्वे आंदोलक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *