डॉ.ज्योतीताई मेटे यांनी विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास दिली भेट
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास डॉ.ज्योतिताई मेटे यांची भेट …
बीड : डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले . या पुर्णाकृती पुतळ्यासाठी स्व.आ. विनायकराव मेटे साहेबंनी प्रशासकीय स्तरावर बरेच प्रयत्न केले होते . या पुतळ्याचे अनावरण झाल्याच्या नंतर आज डॉ. ज्योतीताई मेटे यांचा औरंगाबाद येथील खाजगी दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन विद्यापीठातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भेट देत छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन अभिवादन केले .
डॉ. ज्योतीताई मेटे या औरंगाबाद दौऱ्यावर असताना विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले होते . हा पुतळा बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते . त्यावेळी स्व. विनायकराव मेटे यांनी विद्यापीठात भेट देऊन छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रशासकीय स्तरावर व मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न केले होते व या बहुचर्चित पुतळ्याचे काम पूर्ण झाले व नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न झाला होता,आज डॉ. ज्योतीताई मेटे या औरंगाबादहून येत असताना विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन विद्यापीठ परिसरातील या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले व स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी या पुतळ्यासाठी उभा केलेला संघर्षीची जाणीव आणि आठवण प्रत्येकाला आहे आणि राहील असे म्हंटले यानिमित्ताने विद्यार्थ्यास भेट देत साहेबांचे एक स्वप्न साकार झाल्याने समाधान वाटले असे मतही यावेळी व्यक्त केले
याप्रसंगी शिवसंग्राम संघटनेचे राज्य प्रवक्ते तथा जालना जिल्हा निरीक्षक. प्रा. लक्ष्मण नवले. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण. शिवसंग्राम नेते पांडुरंग आवारे पाटील,सलीम पटेल.युवक शहर अध्यक्ष बाळासाहेब भगनुरे,पैठण तालुका अध्यक्ष. शिवसंग्राम विद्यार्थी मराठवाडा अध्यक्ष सचिन मिसाळ,देशमुख साहेब, वासुदेव मुळीक सर.सुशील जामकर.विराज जोगदंड पा. विशालजी सोळंके. आकाश खोजे पाटील व विद्यापीठातील पदाधिकारी, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.