आरोग्य विभागातील गैरव्यवहार विविध समस्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना निवेदन – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
आरोग्य विभागातील गैरव्यवहार विविध समस्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना निवेदन : डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड जिल्ह्य़ातील कोरोना कालावधीतील आरोग्य विभागातील गैरव्यवहार,कागदोपत्रीच बोगस खरेदी, रक्तपेढीतील वित्तीय गैरव्यवहार,दिव्यांग तपासणी बोर्डावरील आधिका-यांकडुन दिव्यांगाची प्रमाणपत्रासाठी अडवणुक,बीड जिल्ह्य़ातील मुलींचा जन्मदर घटण्यास कारणीभूत गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरण ,दिव्यांगाची तसेच बीड जिल्हा रूग्णालयातील विविध समस्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे,किस्किंदाताई पांचाळ,अड.प्रेरणा सुर्यवंशी,सौ.मंथन ठाकुर,ज्ञानेश्वर आंधळे ,विशिष्ट साबळे यांनी निवेदन देऊन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर अड.संगीताताई धसे,संजीवनी राऊत यांच्या स्वाक्ष-या आहेत.
कोरोना कालावधीतील आरोग्य विभागातील खर्चाचे ऑडीट करूनच खरेदी गैरव्यवहार प्रकरणात(S.I.T.) मार्फत चौकशी करा::-डाॅ.गणेश ढवळे
____
कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील खरेदी कागदोपत्रीच दाखवून मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार ,बीड जिल्ह्य़ातील मुलींचा घटता जन्मदर यास जबाबदार अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात ठोस कारवाई नाही तसेच आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात राजकीय नेते,प्रशासनातील आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमतानेच करण्यात आला असून संबधित प्रकरणात वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसुन संबधित प्रकरणात (S.I.T.) उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच
बीड जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीचा गैरवापर तसेच वित्तीय अनियमितता प्रकरणात आरोग्य संचनालयाने केलेल्या चौकशीत दोषीसिद्ध रक्तपेढी विभागप्रमुख डाॅ.जयश्री बांगर त्यांचे बंधु गणेश बांगर यांच्यासह सहका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच पाठराखण करत कारवाईस जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
मुलींचा जन्मदर घटण्यास कारणीभूत अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील पाळेमुळे उघडुन टाका:-किस्किंदाताई पांचाळ /अड.प्रेरणा सुर्यवंशी
____
बीड जिल्ह्य़ात मुलींचा जन्मदर घटण्यास कारणीभूत अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात संदर्भात मोठे रॅकेट कार्यरत असुन आरोग्य विभागातील तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ आधिका-यांच्या मेहेरबानीमुळे ठोस कारवाई होत नसुन बीड तालुक्यातील बकरवाडी येथील शितल गणेश गाडे अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात मृत्युप्रकरणात पोलीस तपासयंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबधित प्रकरणात दोषी आधिका-यांवर कारवाई करण्यात येऊन मुळासकट पाळेमुळे उखडुन टाकण्याची गरज असून बीड जिल्ह्य़ात महिलांवरील अन्याय,अत्याचार प्रमाणात वाढ झाली असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२