सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनानिमित्त सत्यशोधक समाजाचे कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने गौरव संपन्न
सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनानिमित्त सत्यशोधक समाजाचे कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने गौरव संपन्न
सत्यशोधक जलसा कलावंताचा देखील झाला गौरव
बीड : समाजात असलेला जातीय भेदाभेद, विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा स्थापना केली. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. सत्यशोधक समाजाची स्थापन करून त्यांनी प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. या सत्यशोधक समाजाला आज दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. या समाजाचे विचार आजच्या काळातही अतिशय महत्वाचे असून ते समाजात रुजविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्यशोधक समाजासाठी वाहिले अशा मान्यवरांचा गौरव सोहळा करण्याची संकल्पना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 11: 30 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त बीड जिल्ह्यातील सत्यशोधक समाजाचे कार्य अविरत चालविणाऱ्या डॉ. डीगंबर बोबडे, सत्यशोधक समाजाचे राष्ट्रीय महासचिव ॲड. सुभाष निकम, पाटोदा येथील ज्येष्ठ समाजसेवक सय्यद इकबाल पेंटर, सत्यशोधक पद्धतीने स्वतःचा विवाह लावणारे परमेश्वर बनकर, सौ. कोमल परमेश्वर बनकर यांच्यासह चौसाळा येथील ज्येष्ठ सत्यशोधक जलसा कलावंत दिलीप वायसे, उत्तरेश्वर औताडे, पांडुरंग मानगिरे आदी मान्यवरांचा कृतज्ञतापूर्वक गौरव सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास माजी आमदार नारायणराव मुंडे यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती तर माजी नगराध्यक्ष मोईन मास्टर, परीट समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव जगताप, श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संदीप बेदरे, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रा. पी. टी. चव्हाण, मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. रफिक बागवान, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर ढोणे, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गुंजाळ यांची उपस्थिती होती.
या अविस्मरणीय सोहळ्यास सत्यशोधक समाजातील बांधव, ओबीसी बांधव यांच्यासह महात्मा फुले प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.