क्राईमताज्या बातम्यानाशिक

जुन्या भांडणाची कुरापत काढून तरुणांची धारदार शस्राने हत्या


जुन्या भांडणावरून वादजुन्या भांडणाचे कारणावरून जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याच्या पुढील तपासाकरीता न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित नलवडे हे करत आहेत.

नाशिक : नाशिकमध्ये एका घटनेनं खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाने 20 वर्षीय तरुणांची धारदार शस्राने हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
घटनेने काही दिवसांपासून शांत असलेले नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडली असून पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. येथील मायको सर्कल परिसरात राहणारा रवी शिंदे हा रात्री कालीका नगर येथून घरी पायी जात किरण कोकाटे हा रिक्षाने पाठीमागून आला आणि अचानक रवीवर वार केला. यावेळी कोकाटे याने रवीच्या कमरेच्यावर धारदार शस्राने वार करत त्याला संपवलं.

दरम्यान रात्रीची वेळ असल्याने कोकाटे याने घटनास्थळावरून पळ काढला. रवीच्या वर्मी घाव बसल्याने आणि रक्तस्त्राव अधिक झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात रात्रभर तणावाचे होते. रवी शिंदे यांच्या खुनाबाबत युसुफ अमीर सैयद यांनी किरण रमेश कोकाटे याच्याविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड गंगाधर सोनवणे, सहा.पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग यांनी सदर घटनास्थळी भेट दिली. तसेच संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानंतर घटनास्थळी वपोनि विजय ढमाळ, वपोनी आंचल मुदगल यांनी भेट देत तपास सुरू केला.

हत्या केल्यानंतर आरोपी फरार, असं केलं अटक

त्यानुसार पंचवटी विभागातील पंचवटी, म्हसरूळ, आडगाव येथील गुन्हे शोध पथकाच्या वेगवेगळ्या तीन टीम बनवून संशयित किरण कोकाटे याचा शोध पथके तयार करून रवाना करण्यात आली होती. त्याप्रमाणे पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून संशयित किरण कोकाटे याला सिडको, अंबड नाशिक येथून ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं रवि शिंदे याचा खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *