ग्रामपंचायत हिवरा येथे कृषिदूतांचे आगमन शेतकरी यांना केले मार्गदर्शन
आष्टी : आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत हिवरा येथे श्री. छत्रपती ,शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय आष्टी येथील चतुर्थ वर्षातील विध्यार्थी कृषीदूत यांचे हिवरा या गावात आगमन झाले आहे या वेळी कृषीदूत गौरव आटोळे, ऋषिकेश शेलार, बालाजी बदाले , सिद्धांत साबळे, युवराज गांगर्डे, हरिश गांगर्डे, सचिन चिखलकर, यांचे शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले . व कृषी दूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2022-23 याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली हे कृषी दुत शेतकरी यांना तिन महिने गावकऱ्यांना शेति विषयी मार्गदर्शन करणार आहेत यावेळी , सरपंच केशव चव्हाण , सुदाम चव्हाण, भिमा लगड, चव्हाण मॅडम, सय्यद मॅडम, ग्रामसेवक जोगदंड, प्राचार्य डॉ. एस. आर आरसुळ सर,रावे समन्वयक प्रा.तांबोळी आय.एम आणि प्रोग्राम ऑफिसर प्रा. पी.आर काळे सर, तसेच शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सरपंच व ग्रामस्थांचे आभार कृषी महाविद्यालय आष्टी तर्फे गौरव आटोळे यांनी मानले.