आष्टी तालुक्यातील सुंबेवाडी येथे आयसीआयसीआय फाऊंडेशन व सुंबेवाडी ग्रामपंचायत यांच्या अंतर्गत दि १४/५/२२ शनिवार पासून नदी खोलीकरण व रूंदीकरण कामाला सुरूवात झाली.
आष्टी तालुक्यातील १६ गावांमध्ये असे काम फाउंडेशन च्या वतीने चालू आहे.या कामातून गावातील विहीरी,बोअरवेल व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.यामुळे जवळपास १००एकर ते १५० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.फांउडेशन मार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण शेती,दूध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन,शेतकर्यामधून उद्योजक तयार करण्यासाठी प्रशिक्षण शेतीवर्ग व महिला वर्गाला प्रशिक्षण देण्याचे काम करते या सोबतच पर्यावरण व जलसंवर्धन प्रकल्पाअंतर्गत शनिवारी कामाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनचे डेवल्पमेंट ऑफिसवर चेतन पाटोळे सर,आष्टी समन्वयक बाळासाहेब कांबळे सर, भाऊसाहेब घुले (रा.युवक ता. अध्यक्ष,)महादेव डोके (सरपंच),सुभाष शेठ वाळके,बाबासाहेब भिटे,विजय गायकवाड (सरपंच), सुंबेवाडीचे सरपंच योगेश शेळके, उपसरपंच अशोक गागरे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष वाळके, अनिल शेळके,युवराज शेंडगे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.