जिद्द चिकाटीच्या जोरावर कु. सायली भिमराव हाके हिने महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवा (MPSC)सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)मध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रीत अधिकारी) Gr-B या पदावर मारली बाजी राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव – प्रकाश भैय्या सोनसळे
बीड : गाव सांगोला ता.सांगोला जिल्हा. सोलापूर येथील सायली भीमराव हाके हिने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमपीएससी सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी मध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी ग्रेड बी ) या पदावर निवड झाली आहे
सायली हिने पहिली ते बारावी शिक्षण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगोला येथे झाले डिग्री शिक्षण राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे झाले सायली हाके हिचे वडील सायली दोन वर्षाची असताना भीमराव हाके यांचे निधन झाले व सायली हाके यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखाच्या डोंगरातून सावरून आई व भाऊ यांनी सायलीला साथ देऊन शिक्षणासाठी खंबीरपणे सायलीच्या पाठीमागे उभे राहून सायलीच्या शिक्षणासाठी आईने व भावाने भरपूर कष्ट व मेहनत करून सायलीला शिकवण्यासाठी मेहनत केली आज सायलीला वडील नसून सायली हिने आपल्या आई व भावाचे स्वप्न साकार करण्यासाठी या पदावर जाण्याची जिद्द ठेवली आज खरोखर सांगायचे म्हटले तर सायली एक गरीब घराण्यातील मुलगी आहे.
ती लहान असताना तिचे वडील त्यांना सोडून गेले तिच्या पाठीमागे आईने व भावाने तिला खंबीर साथ देऊन यशाचे शिखर गाठण्याची संधी दिली व सायलीने त्या संधीचे सोने करून आपल्या आई व भावाचे नाव सोलापूर जिल्ह्यामध्ये झळकवले आज सायली सारखी मुली मुले घडले पाहिजेत सायलीची निवड झाल्याबद्दल प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांना कळताच सायलीशी संवाद साधताना म्हटले की एक गावकऱ्यांना आंनद होतो की, एक मुलगी असून सुद्धा खंबीरपणे शिक्षण घेऊन यशाची पायरी चढत असताना अनेक वेळा चढ-उतार येतच असतात परंतु याच चढ उताराला शांत ठेवण्यासाठी जिद्द चिकाटी ची गरज असते आज सायली सारख्या मुली मोठ्या पदावर गेल्या पाहिजेत यासाठी शिक्षण हे आजच्या मुला-मुलींसाठी काळाची गरज आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा व यशस्वी व्हा
सायली ताईंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो व नक्कीच या समाजामध्ये तुमच्या सारख्या मुली तुमच्यासारखे मुले तुमचा आदर्श घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत, आज तुम्हाला राज्यभरातून तुमच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ही संपत्ती तुम्ही कमवलेली आहे याचा तुम्ही स्वीकार करा आपणास मनपूर्वक शुभेच्छा.