भोंग्यांचा आवाजाला बसणार ब्रेक , ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मशिदींना सूचना
मुंबई : मशिदीतील लाऊडस्पीकरवरील अजानला विरोध करत असतानाच भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मशिदींना परवानगी असलेल्या डेसिबल पातळीमध्ये लाऊडस्पीकर वापरण्याची सूचना केली आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी देखील अजान पाळताना किती डेसिबल पातळी असावी हे सांगणारी नोटीस जारी केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली
मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे त्रास होत असल्याने हे भोंगे काढण्यात यावे, अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली होती. भोंग्यांमुळे सकाळी झोपमोड होते, विद्यार्थी, रुग्ण, वृद्ध आणि रात्री काम करणाऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे भोंगे काढण्यात यावे, अशी मागणी होत असते. त्
यातच राज ठाकरे यांनी सरकारला मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली आणि तसे न केल्यास त्यांचा पक्ष मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून “हनुमान चालीसा” वाजवेल, असा इशारा दिला. याची दखल आता गृहमंत्र्यांनी घेतली