पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीबांना मोफत धान्य वाटप
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं शनिवारी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.मंत्रिमंडाळाच्या निर्णयानुसार ही योजना पुढील सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार, लाभार्थ्यांना नियमित धान्य ठाराविक किंमत आणि वजनाप्रमाणं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीबांना मोफत वाटप केलं जातं. ई-पॉस मशीनच्या माध्यमातून याचं वितरण केलं जातं.कोरोना लॉकडाऊन काळात सर्वाधिक परिणाम झालेला वर्ग म्हणजे गरीब कुटुंबं, महिला, शेतकरी आणि श्रमिकांना सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळं त्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत राहत दिलासा पॅकेज लॉन्च करण्यात आलं होतं. या लोकांना सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे तसेच मोफत रेशन आणि एलपीजी सिलेंडर्स देखील देण्यात येत आहेत.