ताज्या बातम्यामुंबई

उद्धवजी ठाकरे यांनी मंत्र्यांवर अन्याय करू नये आदित्य ठाकरे यांना घरकुलाचा चेक देऊन शुभारंभ करावा-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


उद्धवजी ठाकरे यांनी मंत्र्यांवर अन्याय करू नये आदित्य ठाकरे यांना घरकुलाचा चेक देऊन शुभारंभ करावा,मुख्यमंत्र्यांना निवेदन – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आमदारांना केवळ मुंबईतच नव्हे तर मतदारसंघात सुद्धा घरकुल देऊन मुख्यमंत्री, मंत्रीमहोदयांवर अन्याय न करता त्यांनाही घरे बांधुन देण्यात यावीत तसेच आमदारांच्या घरकुलाचा पहिला चेक ना. आदित्य उद्धवजी ठाकरे याना आपल्या हस्ते देऊन आमदारांच्या घरे बांधण्याच्या शुभारंभ करण्यात यावा असे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राषट्रवादी कांग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री, प्रधान सचिव, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांना दिले आहे.

सविस्तर माहीतीस्तव

महाराष्ट्र आघाडी सरकारने आमदारांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देतानाच काल दि.२४ मार्च २०२२ रोजी आमदारांना मुंबईत घरे बांधुन देणार असल्याचे जाहीर केले असून राज्यात ९० हजार एस. टी. कर्मचा-यांना वा-यावर सोडून, ६० हजार विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न तसाच ठेवत, शेतक-यांचा विजपुरवठा खंडीत करून शासन तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण देताना आमदारांना केवळ मुंबईत घरे बांधुन देण्याचा निर्णय अन्यायकारक असून त्यांना मतदारसंघात सुद्धा एक घरकुल तसेच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर अन्याय न करता त्यांनाही घरकुल देण्यात यावे आणि आमदारांच्या घरकुलाचा पहिला चेक ना. आदित्य उद्धवजी ठाकरे यांना आपण स्वतः देऊन स्तुत्य उपक्रमास सुरूवात करावी, गोरगरीब आमदारांकडे सहानुभूतिपूर्वक लक्ष दिल्याबद्दल सामान्य जनतेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *