बीड : आष्टी आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी संचलित तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्न असलेल्या अन्नतंत्र महाविद्यालय,आष्टी जि.बीड या महाविद्यालयास वनामकृवि,परभणी येथील मूल्यांकन समितीने येथे उपलब्ध असलेल्या भौतिक व शैक्षणिक सुविधांच्या आधारे ‘ब ‘ दर्जा दिलेला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी ,कष्टकरी यांच्या मुलांना कृषी संलग्न व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा ग्रामीण स्तरावरच उपलब्ध व्हावी या शुद्ध हेतूने मा.आ.भीमराव धोंडे यांनी २०१५ ला महाविद्यालयाची स्थापना केली .अल्पावधीतच या महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत या यशापर्यंत मजल मारलेली आहे.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब, संचालक डॉ.अजय (दादा) धोंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत,श्री.एस.जी विधाते,श्री.दत्तात्रय गिलचे,श्री.माऊली बोडखे ,श्री संजय शेंडे इत्यादींनी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस.मोहळकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.