मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा नगर पंचायत कार्यालयात सोडणार-कैलास दरेकर
————————————————
नगर पंचायत अधिकारी गिते म्हणजे असून अडचण,नसून खोळंबा…!
————————————————
आष्टी(प्रतिनिधी)-गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून,
या जनावरांमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.जर नगर पंचायत ने आठ दिवसात या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर शहरातील सर्व जनावरे आष्टी नगर पंचायत कार्यालयात आणून सोडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
गेल्या तीन चार महिन्यापासून आष्टी शहरात पन्नास ते साठ मोकाट जनावरे फिरत असून,त्यामध्ये तीन ते चार कटाळे बैल पण असून,या जनावरांची व्यापारपेठेच झुंज होते.त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव पण जाऊ शकतो.याबाबत नगर पंचायतला वेळोवेळी लेखी तोंडी माहिती दिली.तसेच एकवेळेस रस्तारोकोही केला होता.तरीही या निगरगठ्ठ गेड्यांची कातडे असलेल्या नगर पंचायत प्रशासनाला कसलाच फरक पडत नाही.या जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका असून,नागरिकांच्या जीवितास काही झाल्यास यास सर्वस्वी नगरपंचायत प्रशासन जबाबदार असेल,ह्या मोकाट गुरे तसेच इतरही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा,अन्यथा हे सर्व मोकाट जनावरे नगरपंचायत कार्यालयात सोडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी,तहसिलदार आष्टी व पोलिस निरीक्षक आष्टी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
पंचवीस तारखेला गुरं नगर पंचायतमध्ये सोडणार-दरेकर
———————————————————
गेल्या तीन चार महिन्यापासून आष्टी शहरात मोकाट जनावरे,डुकरे यामुळे व्यापारपेठेत नागरीक येण्यास टाळतात तसेच जवळपास पन्नास ते साठ जनावरांनी नागरीक परेशान झाले आहेत.जर या जनावरांच्या झुंजीमुळे एखाद्या नारीकांचा जीव गेला तर याला जबाबदार नगर पंचायत राहिल.जर आठ दिवसात या जनावरांचा बंदोबस्त नाही केला तर दि.25 मार्च रोजी नगर पंचायत कार्यालयात हे सर्व मोकाट जनावरे सोडण्यात येतील.
-कैलास दरेकर,जिल्हाध्यक्ष मनसे
————————————————————
नगर पंचायतचे अधिकारी गितेंना काम न करण्याची अॅलर्जी
——————————————————
आष्टी नगर पंचायतचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी अजिनाथ गिते हे आष्टी नगर पंचायतला असून अडचण नसून खोळंबा असे म्हणटले तरी वावगे ठरणार नाहीत.साधं निवेदन जरी नगर पंचायतला घेऊन गेले तरी हे महाशय शियापाला या निवेदनाच्या पोहच वर सही करायला लावतात.ह्या नगर पंचायतच्या गिते अधिकारी यांना काम न करण्याची अॅलर्जी असल्याचे निदर्शनास आले.