भारताने शुक्रवारी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलं, की “9 मार्च 2022 रोजी नेहमीच्या देखभालीदरम्यान एक तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे चुकून एक क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. भारत सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.
९ मार्च रोजी भारतीय क्षेपणास्त्र (Indian Missile) पाकिस्तानी हद्दीत (Pakistan Area) १२४ किमी आत पडल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य (Indian Ministry of Defense Accept) केले आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे – ही घटना ‘अपघाती गोळीबारा’मुळे घडली आहे.
ही घटना ९ मार्च २०२२ रोजी नियमित देखभाल दरम्यान तांत्रिक कारणांमुळे घडली. सरकारने हे प्रकरण गांभिर्याने घेतले असून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. या घटनेबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. चांगली बाब म्हणजे या अपघाती गोळीबारामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रकरण कसे उलगडले
पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे डीजी मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत या घटनेचा खुलासा केला. बाबर म्हणाले होते – भारताने आपल्या देशावर जे काही गोळीबार केले, त्याला तुम्ही सुपर सॉनिक फ्लाइंग ऑब्जेक्ट किंवा मिसाइल म्हणू शकता. त्यात कुठलेही शस्त्र किंवा दारूगोळा नव्हता. त्यामुळे कोणतीही नासधूस झाली नाही.
बाबर यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी पाकिस्तानी मीडियामध्ये मियां चन्नू परिसरात भारतीय खाजगी विमान कोसळल्याच्या बातम्या आल्या होत्या. पाकिस्तानी लष्करही घटनास्थळ मुलतानजवळील मियां चन्नू परिसर असल्याचे सांगत होते.
बाबर यांचे विधान
डीजी ISPR म्हणाले – ९ मार्च रोजी संध्याकाळी ६.४३ वाजता भारताकडून पाकिस्तानच्या दिशेने खूप वेगाने क्षेपणास्त्र डागण्यात आले. आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ते पकडले, परंतु ते मियां चन्नू परिसरात त्वरीत पडले. भारतातून पाकिस्तानला पोहोचायला ३ मिनिटे लागली. एकूण १२४ किलोमीटर अंतर कापण्यात आले. ६.५० वाजता तो कोसळला. काही घरांचे व मालमत्तेचे नुकसान झाले. हे क्षेपणास्त्र भारतातील सिरसा येथून डागण्यात आले.
फ्लाइट मॅपची माहिती मिळाली
बाबर म्हणाले- आमच्या टीमने या क्षेपणास्त्राचा उड्डाण मार्ग शोधला आहे. हे अत्यंत धोकादायक पाऊल आहे, कारण ज्या वेळी हे क्षेपणास्त्र डागण्यात आले, त्या वेळी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीत अनेक उड्डाणे सुरू होती आणि मोठी दुर्घटना घडू शकते. आम्ही हे गांभीर्याने घेत असून भारताने या प्रकरणावर थेट उत्तर देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी त्यांच्या पाणबुड्या कराचीजवळ दिसल्या होत्या. सध्या आम्ही भारताच्या उत्तराची वाट पाहत आहोत. त्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल. आता भारताने हे क्षेपणास्त्र चुकून डागल्याची पुष्टी केली आहे.