पाटोदा तालुक्यातील बालकांच्या कुपोषणास जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करा
पाटोदा तालुक्यातील विविध गावातील आढळलेल्या १८ कुपोषित बालकासंदर्भात आवश्यक उपाययोजना करून संबंधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष पाटोदा हमीदखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार रूपाली चौगुले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, संतोष तांबे, रियाज सय्यद, शेख महेशर, शेख जावेद, अजय जोशी, बबन पवार, आदि उपस्थित होते.
सविस्तर
कुपोषण निर्मुलनासाठी लहान बालकांना योग्य व सकस आहार ज्यामुळे बालके सुदृढ व निरोगी राहावीत म्हणून मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात येते. ८ बालविकास केंद्राच्या माध्यमातुन कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असून यासाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात येतो.मात्र स्थानिक पातळीवर शासकीय योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे न झाल्याने कुपोषित बालके आढळुन येतात .
पाटोदा तालुक्यातील ० ते ६ वयोगटातील एकुण १०,८८३ बालके असून फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अहवालात ० ते ०६ वयोगटातील १८ कुपोषित बालके आढळुन आली, यापैकी पाटोदा २, सौताडा १ ,डोंगरकिंन्ही ४ ,शिखरवाडी १ ,कारेगाव १ ,चुंभळी २ ,हांडेवाडी १ ,वैद्यकिन्ही १,ढगाची वाडी १ यासह ईतर गावात उंचीच्या प्रमाणात योग्य वजन व वाढ नसलेली कुपोषित बालके आढळुन आली असून संबधित प्रकरणात योग्य ती उपाययोजना करण्यात येऊन शासकीय योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावनी न केल्याबद्दल संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
बीड जिल्ह्य़ातील कुपोषित बालकांची तपासणी करण्यात येऊन संबधित जबाबदारआधिका-यांवरप्रशासकीयकारवाईकरण्यातयावी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बालविकास केंद्राच्या माध्यमातुन कुपोषण निर्मूलनासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात येऊन जर पाटोदा तालुक्यात १८ कुपोषित बालके आढळुन आली असून संपुर्ण बीड जिल्ह्य़ातील बालकांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येऊन कुपोषणास जबाबदार संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.