बीड : किल्ले धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील एक होतकरू मेंढपाळ बाळासाहेब धापसे यांची कन्या अश्विनी बाळासाहेब धापसे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून मुलीमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे या यशामुळे तिचे पोलीस उपनिरीक्षक पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून तिच्या यशाबद्दल अखंड महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या शुभेच्छांचा वर्षाव अश्विनी धापसे यांच्यावर होत आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०१९ पोलीस उपनिरीक्षक पदाची पीएसआय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत एनटीसी Nt-c गटात मुलीतून बीड जिल्ह्यातील धारूर तालुका येथील खेड्यागावातील अंजनडोह गावची अश्विनी बाळासाहेब धापसे हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे अश्विनी धापसे हिने दहावीपर्यंत शिक्षण अंजनडोह येथे तर कोल्हापूर येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतले औरंगाबाद येथे ज्येष्ठ बंधू योगीनंदन बाळासाहेब धापसे यांच्यासोबत राहून त्यांच्या प्रेरणेने स्वअध्ययन करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २०१९ च्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले.
अंजनडोह येथे दोन भाऊ आई-वडील अशा जेमतेम पाच माणसाचं धापसे कुटुंब आहे अनेक वर्षापासून त्यांचा मेंढपाळाचा हा व्यवसाय आहे मेंढपाळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात स्वतः वडील मेंढपाळ असूनही त्यांनी कधी आपल्या मुलीला कधीच कमी पडून दिलं नाही आज एका मेंढपाळाची जर मुलगी पीएसआय होऊ शकते तर आपल्या सुशिक्षित घराण्यातली मुले तहसीलदार झाले पाहिजेत कलेक्टर झाले पाहिजेत असे प्रकाश भैय्या सोनसळे यांनी अश्विनी धापसे यांना बोलताना सांगितले
यासाठी यश संपादन केले पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज मेंढपाळ कुटुंबातील मुलगी अश्विनी हिने आपल्या आई-वडिलांचं स्वप्न साकार केले आहे आणि अश्विनी हिने मोठे यश संपादन केले आहे कोरडवाहू शेती करून उदरनिर्वाह करत शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या धापसे कुटुंबीय व आश्विनी धापसे हिचे अखंड महाराष्ट्रातील धनगर समाज यांच्या कडून फोनवरून शुभेच्छा देण्यात येत आहेत