पणजी: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात संशयित गजेद्र सिंग ऊर्फ छोटू याच्यावर आशिफ व इम्तियाज या दोघा कैद्यांनी हाणामारी करत प्राणघातक सुरीहल्ला केली. ही घटना मंगळवारी सकाळी 7:30 वाजता कारागृहातील खोलीत घड छोटूचे अनेकांशी वैर असल्याने हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
Russia Ukraine War: सौरक्षणासाठी गोमंतकीय विद्यार्थिनीने घेतला बंकरचा आसरा
कळंगुट (Calangute) येथील सोझा लोबो रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजेंद्र सिंग न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली आहे. कच्चे कैदी छोटू तसेच आशिफ व इम्पिताज हे कारागृहातील एकाच खोलीत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खोली क्रमांक 3 मध्ये कोणाचे वर्चस्व यावरून शाब्दिक खटके उडत होते. छोटूची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याने त्याचे अनेकांबरोबर कळंगुट परिसरात वैमनस्य आहे. या खोलीमध्ये सुमारे 100 कच्चे कैदी एकत्रित ठेवण्यात आले आहेत.
गजेंद्र सिंग ऊर्फ छोटू हा या कच्च्या कैद्यांवर रुबाब दाखवत असल्याने त्यांना खुन्नस होती. त्यामुळे दोघा कैद्यांनी सकाळच्या सुमारास त्याच्या सुरीने हल्ला करत वचपा काढला. या घटनेमुळे कच्चे कैद्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कारागृहातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 7:30 च्या सुमारास छोटू तसेच आशिफ व इम्तियाज या कच्च्या कैद्यांत बाचाबाची सुरू झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन त्याचे पर्यावसान प्राणघातक हल्ल्यात झाले. आशिफने केलेल्या सुरीहल्ल्यात छोटू याच्या चेहऱ्यावर तसेच पोटावर जखमा झाल्या. या झालेल्या हाणामारीवेळी कारागृहाच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत हाणामारी नियंत्रणात आणली. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून छोटूच्या गंभीर जखमांवर कारागृहातील दवाखान्यात उपचार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, छोटू याने उपजिल्हा इस्पितळात (Hospital) उपचारासाठी नेण्यास सपाटा लावल्याने त्याला तेथे नेण्यात आले. यावेळी हे प्रकरण कारागृह अधिकारिणीकडून दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे या सूत्राने सांगितले.
सुरी आली कोठून?
हल्ल्यासाठी कैद्यांनी वापरलेली सुरी कोठून आणली याचा शोध तुरुंग अधिकारी घेत आहेत. कारागृहातील स्वयंपाक खोलीमध्ये कैद्यांना जेवण करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सुऱ्या कामावेळीच दिल्या जातात. काम संपल्यानंतर त्या पुन्हा परत मोजून घेतल्या जातात. त्यामुळे या कैद्यांकडे हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली सुरी कोठून आली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गोव्यातील एसीजीएल कंपनीचा पगारवाढ प्रश्न मिटला
कोलवाळ (Colvale) कारागृहात कच्चे कैद्यांमध्ये हाणमारी झाली. या हल्ल्यात गजेंद्र सिंग हा किरकोळ जखमी झाला असून गंभीर असे काही नाही. त्याच्यावर उपजिल्हा इस्पितळात उपचार करून पुन्हा कारागृहात आणण्यात आले आहे. या घटनेचा अहवाल तयार करून तो आज तुरुंग महानिरीक्षकांड संध्याकाळपर्यंत सुपूर्द करण्यात आला. या हल्लेमागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे.
वासुदेव शेट्ये, अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक