क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

बीड हवाला रॅकेटचा पर्दाफाश , 51 लाखांची रोकड जप्त


बीड पोलिसांनी शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केलाय. आयकर चुकवून पैशांचा बेकायदा व्यवहार करणारे हे हवाला रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने, बीड शहरात ३ ठिकाणी छापेमारी करत ५१ लाखांची रक्कम जप्त केली आहे.हे रॅकेट चालवणाऱ्या ३ व्यवस्थापकांना पोलिसांनी अटक केली आहे.

आयकर चुकवून टोकन पैशांची देवणा-घेवाण करणारे काही जण बीडमध्ये हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली होती. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापेमारी करत ही कारवाई केली. पोलीस पथकाने शहरातील कबाड गल्लीतील न्यू इंडिया अंगडिया येथे कारवाई करत ३५ लाख ७९ हजार रुपये, जालना रोडवरील आर. क्रांती ट्रेडर्स येथे ९ लाख रुपये तर सिध्दीविनायक व्यापारी संकुलासमोर कारवाईत ६ लाख ४१ हजार रुपये, अशी एकूण ५१ लाख २६ हजार रुपयांची बेकायदा रोकड जप्त केली आहे.

यावेळी पोलिसांनी मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडुरंग घाडगे या तीन व्यवस्थापकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या कारवाईने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *