आष्टी तालुक्यातील मतदान केंद्रावर BLO व गावातील मतदार यांनी मतदार दिवसाची प्रतिज्ञा घेउन केला राष्ट्रिय मतदार दिन साजरा
बीड : आष्टी राप्ष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022 रोजी तहसील कार्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यालयात तहसीलदार विनोद गुंडवार,नायब तहसीलदार बळवंत मोरे,तहसीलदार पंढरपूरे,नायब तहसीलदार शारदा दळवी,दिव्यांग मतदार ‘पत्रकार’ अण्णासाहेब साबळे,राजू देशमुख,अशोक गायकवाड, रूपाली योग्य,संगीता चितळे व इतर दिव्यांग मतदार उपस्थित होते.जळगाव मध्ये भारताची लोकशाही ही भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने दाखवून दिले.अशा या भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली.त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.तसेच प्रशासनाच्या वतीने सर्व शाळा महाविद्यालय कॉलेज येथे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रतिज्ञा घेण्यात येवून घोष वाक्ये घोषणा देण्यात आल्या व सविस्तर मार्गदर्शन करत पात्र व्यक्तीना मतदार नोंदणी करणे बाबत सांगण्यात आले.