ताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

बीड जलशुद्धीकरण प्रकल्प मंगळवारी पूर्ण, बीडकरांना भेट


अवर्षणग्रस्त बीड जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला सर्वांनी अनुभवला आहे. त्या परिस्थितीतही बीड शहरात मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होत होता. माजलगाव धरणातून शहराला पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागला नव्हता. भविष्यात पाणी टंचाईच सामना करता यावा किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊच नये, या दूरदृष्टीतून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या परिश्रमातून अमृत अटल योजना बीड शहरामध्ये राबविण्यात आली.

ही योजना लवकरच पूर्णात्वास जाणार आहे. या योजनेमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात आला आहे. नविन फिल्टरची क्षमता 2 कोटी 50 लाख लिटर असणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सोलार प्लान्टवर असणार असल्याने मोठ्या प्रमाणावर विद्युत बचतही होण्यास मदत होणार आहे. 2050 साली पाण्याची समस्या डोळ्यासमोर ठेवत ही योजना पूर्णत्वास जात आहे. भविष्याच्या दृष्टीने अमृत अटल योजना बीडवासियांसाठी वरदान ठरणार आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन 135 लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. काडीवडगाव येथील प्रकल्पस्थळी नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य गणपत डोईफोडे, सभापती विनोद मुळूक, नगरसेवक शुभम धूत, कार्यकारी अभियंता पी.जी.जोगदंड, उपकार्यकारी अभियंता राख, शाखा अभियंता एम.एस.वाघ, अमोल बागलाने आदी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *