दही हा एक पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. प्रोबायोटिक पोषणतत्त्वं यात भरपूर प्रमाणात असतात. काही लोक यात साखर टाकून खातात तर काही लोक यात मीठ टाकतात. या दोघांपैकी नेमकं काय खायला हवं याबद्दल जाणून घेऊयात.
दह्यामध्ये साखर टाकून खाल्ल्याने दह्याचा आंबटपणा कमी होतो. आणि त्याची चवही सुधारते. म्हणूनच साखर टाकलेलं दही खाणं लहान मुलांना आणि गोड खाणाऱ्यांना फार आवडतं. साखर हे एक असं कार्बोहायड्रेट आहे जे शरीराला त्वरित ऊर्जा देते. हे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना तत्काळ ऊर्जेची आवश्यकता असते. जसे की अॅथलेट किंवा लहान मुलं.
आरोग्यतज्ञांच्या म्हणण्यानुसार, फर्मेंटेड दह्यामध्ये फायदेशीर प्रोबायोटिक असतात जे आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. साखर टाकल्याने हे प्रोबायोटिक उत्तेजित होतात. त्यांची गतिविधी वाढते आणि त्यामुळे त्याने होणारे लाभ वाढू शकतात.
नुकसानीबद्दल बोलायचं झाल्यास साखर दह्यात टाकल्याने कॅलरीज आणि शुगर वाढते. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. अधिक साखरेचे सेवन करणे मधुमेह, जाडपणा आणि हृदयासंबंधीच्या समस्या वाढवू शकतात.
दह्यामध्ये मीठ टाकल्याने त्यातील पचन करणारे एंझायम्स उत्तेजित होतात ज्यामुळे पचनक्रिया अधिक तेजीने होऊ शकते. ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांच्यासाठी दह्यात मीठ टाकून खाणं फायदेशीर ठरू शकतं.
दही हे कॅल्शियम आणि अन्य आवश्यक पोषक तत्त्वांचा एक चांगला स्रोत आहे. तर मीठ हा सोडियमचा प्रमुख स्रोत आहे. या दोघांच्या संयोगाने शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राहण्यात मदत होऊ शकते. खासकरुन जे लोक खूप जास्त व्यायाम करतात. त्यांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटसची घामावाटे हानी होते. अशा लोकांनी दह्यामध्ये मीठ टाकून खाणे फायदेशीर ठरतं. परंतु मिठाचे अतिसेवन उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधी आजाराची जोखीम वाढवू शकते. अशात मिठाचा मर्यादित प्रमाणात वापर करायला हवा.
दह्यामध्ये साखर आणि मीठ टाकून खाणं वैयक्तिक आरोग्यावर आणि स्वादावर अवलंबून आहे. जर तुम्ही वजन नियंत्रित करु इच्छित असाल आणि पचनशक्ती सुधारु इच्छित असाल तर मीठ टाकलेले दही खाणं हा चांगला पर्याय आहे आणि जर तुम्हाला त्वरित ऊर्जा हवी असेल तर साखर टाकून दही खायला हवे. परंतु दही नियमित आणि योग्य प्रमाणात घ्या. मग ते साखरेसोबत असो किंवा मिठासोबत खा.