आरोग्य

चष्मा आता विसरा ! भारतात जादुई ‘आय-ड्रॉप’ला मिळाली मंजूरी; कमी दिसणाऱ्यांसाठी संजीवनी


कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांना यापुढे चष्मा घालण्याची गरज नाहीये. अस्पष्ट दृष्टी असलेल्या आणि चष्म्याशिवाय काहीही वाचू शकत नसलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन ‘आय ड्रॉप्स’ला भारतात मान्यता देण्यात आलीय.

 

मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने प्रीस्बायोपिया उपचारासाठी PresVu Eye Drop विकसित केला आहे. प्रिस्बायोपिया नैसर्गिकरित्या वृद्धत्वासह उद्भवते, ज्यामुळे जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.

 

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (CDSCO) विषय तज्ञ समितीने (SEC) या उत्पादनाची यापूर्वी शिफारस केली होती. त्यानंतर आता ENTOD फार्मास्युटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून अंतिम मंजुरी मिळाली. PresVu हा भारतातील पहिला आय ड्रॉप असल्याचा दावा केला जात आहे, ज्याची रचना प्रेस्बायोपिया असलेल्या लोकांमध्ये चष्मा लावून वाचण्याची गरज कमी करण्यासाठी केली गेली आहे.

 

ENTOD फार्मास्युटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अंतिम मान्यता मिळाली. उत्पादकांनी या अनोख्या फॉर्म्युलेशनसाठी आणि त्याच्या उत्पादन प्रक्रियेसाठी पेटंटसाठी अर्ज केला होता. PresVu ची मान्यता नेत्ररोग शास्त्रातील एक मोठे पाऊल मानले जात आहे. ENTOD फार्मास्युटिकल्सचे सीईओ निखिल के मसुरकर यांनी या मान्यतेचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, “PresVu हे अनेक वर्षांच्या संशोधनाचे फलित आहे. PresVu हे केवळ एक उत्पादन नाही, तर हा एक उपाय आहे जो लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश टाकेल.”

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *