आरोग्य

आंबा खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे; फळांच्या राजाचे हे महत्त्वपूर्ण गुणधर्म तुमच्या आरोग्यासाठी ठरतील गुणकारी


आंबा हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे सर्वात लोकप्रिय फळ आहे आणि बहुधा लोकांचेही आवडते फळ आहे. पण दुर्दैवाने या फळाबद्दल अनेक गैरसमज आपल्याला सांगितले जातात. तुम्‍ही वजन कमी करण्‍यासाठी डाएटवर असाल तर, आंबा खाऊ नका असं सांगितलं जातं. कारण, तो खूप गोड आणि कॅलरींनी भरलेला असतो.

आंबा ही चवीसोबतचं आरोग्यदायी फायद्यांची खाण आहे. आंबा हा फळांचा राजा मानला जातो. आंब्याशिवाय उन्हाळा अपूर्ण आहे. तुम्ही कोणतेही फळ केव्हाही खाऊ शकता. मात्र, आंबा हे फळ तुम्ही फक्त उन्हाळ्यातचं खाऊ शकता. चवीसोबतच आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला, तर मग फळांच्या राजाचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

 

आंबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

 

कर्करोग प्रतिबंध

 

आंब्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट कोलन कॅन्सर, ल्युकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे. यात क्वेर्सेटिन, अॅस्ट्रागालिन आणि फिसेटीन सारखे अनेक घटक असतात जे कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त आहेत.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण 

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी वरदान आहे. यामुळे डोळ्यांचा प्रकाश कायम राहतो.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत 

आंब्यामध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल संतुलित होण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर 

आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा चमकदार होतो आणि व्हिटॅमिन सी संसर्गापासूनही संरक्षण होते.

पचनक्रिया सुधारण्यास मदत 

आंब्यामध्ये अनेक एंजाइम असतात जे प्रथिने तोडण्याचे काम करतात. त्यामुळे अन्न लवकर पचते. यासोबतच यामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड, टार्टरिक अॅसिड शरीरातील क्षारीय घटकांना संतुलित ठेवते.

चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील चांगला उपाय आहे. आंब्याच्या फोडीमध्ये असलेले तंतू शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी लागते. त्यामुळे जास्त खाण्याचा धोका कमी होतो.

प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत 

आंबा खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.

सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात आढळते आणि त्यामुळे लैंगिक क्षमता वाढते. यासोबतच हे पौरुषत्व वाढवणारे फळही मानले जाते.

स्मरणशक्ती वाढण्यास मदत 

ज्यांना स्मृतिभ्रंश आहे, त्यांनी आंब्याचे सेवन करावे. यामध्ये आढळणारे ग्लूटामाइन ऍसिड नावाचे घटक स्मरणशक्ती वाढविण्यास उत्प्रेरक म्हणून काम करतात. यासोबतच रक्तपेशीही याद्वारे सक्रिय होतात. त्यामुळे गरोदर महिलांना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.

उष्णता संरक्षण 

उन्हाळ्यात जर दुपारी घराबाहेर पडावे लागत असेल तर एक ग्लास आंब्याचा रस पिऊन बाहेर पडावे. तुम्हाला उष्णता जाणवणार नाही. आंब्याचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *