जनरल नॉलेज

रिमोर्टने बंद केलं, पण मेन स्विच ON असेल तरी वीज वापरली जाते?


अशा अनेक गोष्टी आहे, ज्या आपण रिमोर्टने बंद करु शकतो. ज्यामध्ये एसी, फ्रीज, टीव्ही, पंखा, कुलर सारख्या गोष्टी आहेत. ज्यामुळे या वस्तूंना वापरणं सोप्पं होतं. पण अनेकदा रिमोर्टनं गोष्टी बंद केल्या तरी देखील त्याचा मेन स्विच बराच वेळ सुरुच रहातो.

अशावेळी प्रश्न उपस्थीत रहातो की मुख्य स्विच चालू राहिल्याने वीज वाया जाते का?

अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे. परंतू लोकांना याचं उत्तर माहित नाही. चला याबद्दल थोडी माहिती घेऊ.

आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की रिमोटने एखादी गोष्ट बंद केली आणि मेन स्विच चालू असेल तर विजेचा वापर होत नाही. पण तसे नाही. मेन स्वीच चालू असेल तर विजेचा वापर होते हे निश्चित आहे.

बीजली बचाओ डॉट कॉमच्या अहवालानुसार, हा वापर त्या गॅझेटमध्ये (वस्तूमध्ये) वापरल्या जाणाऱ्या विजेच्या 7 ते 10 टक्के इतका आहे. म्हणजेच, जर तुमचा एसी एका तासात एक युनिट वीज वापरत असेल, तर रिमोटवरून बंद केल्यावर आणि मुख्य स्विच चालू असताना एका युनिटपैकी 7 ते 10 टक्के वीज वापरली जाईल.

वीज सर्वात जास्त कशासाठी वापरली जाते?

घरातील काही वस्तू सर्वाधिक वीज वापरतात. यामध्ये एसी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फ्रिजचा क्रमांक येतो. यानंतर जुना पंखा आणि कुलर येतो. जर तुमच्याकडे जुना पंखा किंवा जुना कुलर असेल तर तो जास्त वीज वापरतो. याशिवाय, जर तुमच्या घरात अजूनही 100 वॅटचे पिवळे बल्ब लावले असतील तर ते जास्त वीज वापरतात.

वीज बिल कसे कमी करावे?

उन्हाळा सुरू झाला आहे, अशा स्थितीत एसी, फ्रीज, कुलर, पंखा, सर्व काही वापरले जाईल. आता प्रश्न पडतो की तुमचे वीज बिल वाढत असेल तर ते कमी कसे करणार? आज आम्ही तुम्हाला यासाठी काही उपाय सांगणार आहोत. घरात चार लोक असतील तर रात्री एकाच खोलीत एसी लावून झोपण्याचा प्रयत्न करा. याशिवाय फ्रीजमध्ये फारसं काही नसेल तर रात्री फ्रीज बंद ठेवा. असे केल्याने तुम्ही तुमचे वीज बिल दर महिन्याला कमी करू शकाल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *