हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका. दिवसेंदिवस हार्ट अटॅकच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकने मृत्यू होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
ही अपघाती घटना असून हार्ट अटॅक कधी येईल हे सांगता येणार नाही.
असे अनेकांचे म्हणणे आहे. हार्ट अटॅकच ही अचानक घडणारी घटना असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण तुम्हाला माहित आहे का हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच शरीरात दिसून येतात. ही लक्षणे कोणती आहेत? हार्ट अटॅक आल्यावर कोणतीा काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या…
जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच दिसू लागतात. या तपासणी प्रक्रियेत 500 हून अधिक महिलांचा सहभाग असून ज्या महिल्या हार्ट अटॅकमध्ये बचावल्या होत्या त्यापैकी 95 टक्के महिलांना महिन्याभरापूर्वी त्यांच्या शरीरात काही बदल जाणवू लागले होते. हे बदल हार्ट अटॅकची लक्षणे असून 71 टक्के महिलांना जास्त थकवा येत असतो तर 48 टक्के महिलांना झोपेशी निगडीत समस्या जाणवत होते. तर अन्य स्त्रियांना छातीदुखी, छातीवर दाब येणे, वेदना ही लक्षणे जाणवत होते.
ही आहेत महिन्याभरपूर्वी समजतात लक्षणे
एक महिना आधी हार्ट अटॅक येणारपूर्वी थकवा येणे, झोप कमी लागणे, थकवा जाणवणे, सतत चिंता सतावणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा किंवा हात सुन्न होणे, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, भूक न लागणे, हात पायांना मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास होणे या सर्वगोष्टी म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
अशी घ्या काळजी
हार्ट अटॅकमध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी निरोगी आहाराचे लक्ष्य ठेवणे. सध्याच्या धकाधकीच्या काळात निरोगी आहाराकडे लक्ष राहत नाही. आणि हेच हार्ट अटॅकचे कारण ठरू शकते. याशिवाय धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर वेळीच ही सवय सोडून द्या. कोणत्याही प्रकारे धूम्रपान आणि मद्यपानास समर्थन देणार नाही. म्हणून, निरोगी आत्मसात करा आणि हृदयविकारापासून स्वतःचे संरक्षण करा.