जनरल नॉलेजशेत शिवार

कोंबडी आधी की अंडे..? अखेर या प्रश्नाचे उत्तर समोर आलेच..


कोंबडी आधी की अंडे.. हा खरा तर अगदी वैश्विक प्रश्न.. सातत्याने उपस्थित केला जातो.. शतकानुशतके या प्रश्नाने लोकांना सतावलंय. कित्येकदा मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात हा प्रश्न आपण एकमेकांना विचारलाही असेल, पण अजूनपर्यंत तरी त्याचे समाधानकारक उत्तर कोणालाही देता आलेले नव्हते.

अनेकांनी या प्रश्नाचे गूढ उकलण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना काही त्यात यश आले नाही.

मात्र, आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. एका वृत्तानुसार, ब्रिटनमधील शेफिल्ड आणि वारविक विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात संशोधन केलं. अंडी आणि कोंबडीच्या प्रदीर्घ अभ्यासातून असे समोर आले, की या जगात पहिल्यांदा अंडी नव्हे, तर कोंबडीच आलीय.

या खास संशोधन पथकाचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ डॉ. कॉलिन फ्रीमन म्हणाले, की ‘अंडी आधी आली की कोंबडी, याविषयी बऱ्याच दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत होते. आता आमच्याकडे पुरावे आहेत, ते आम्हाला सांगतात की या जगात कोंबडीच प्रथम आलीय.

हे कोडे मात्र कायम..
कोंबड्यांच्या अंड्याच्या कवचात ‘ओव्होक्लिडिन’ नावाचे प्रोटीन आढळते. या प्रथिनाशिवाय अंडी तयार होणे अशक्य आहे. हे प्रथिन फक्त कोंबडीच्या गर्भाशयातच तयार होते, त्यामुळे या जगात पहिल्यांदा कोंबडीच आलीय. तिच्या गर्भाशयात ‘ओव्होक्लिडिन’ तयार झाले. त्यानंतर हे प्रथिन अंड्याच्या कवचापर्यंत पोहोचले. शास्त्रज्ञांच्या या संशोधनातून जगात अंडे नव्हे, तर कोंबडी आल्याचे समोर आले. मात्र, तरीही मग जगात कोंबडी कशी तयार झाली, हा प्रश्न एक न सुटलेले कोडेच आहे..


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *