जनरल नॉलेज

टायटॅनिक जहाजाची खरी स्टोरी, हे जहाज कसे बुडाले?त्यावेळी लोकांच्या जेवणात कोणकोणते पदार्थ होते


१० एप्रिल, १९९२ ची घटना आहे. त्या काळाचे जगातील सर्वांत मोठे आणि आलीशान जहाज पाहल्या जलप्रवासाला निघाले. हे जहाज इंग्लंड मधील साऊथॅप्टन, इंग्लंड ते न्यूयॉर्कला जात होते. सर्व प्रकारचे लोक जहाजावर होते. त्यामध्ये नामवंत उद्योगपती, कलाकार तसेच स्थलांतरित जे चांगल्या आयुष्याच्या शोधात न्यूयॉर्कला जात होते. या जहाजाचे नेतृत्व ६२ वर्षाचे experienced Captain of Titanic ship Captain John Smith हे करत होते. या जहाजाबाबत प्रवशांमध्ये, लोकांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये मोठी खळबळ उडालेली होती.

हे केवळ जगातील सर्वांत मोठे जहाज नव्हते तर सुमारे २६९ मीटर लांब आणि ५३ मीटर उंच असे विस्मयकारक आलीशान असे हे जहाज होते. त्या काळात हे जहाज तयार करण्यासाठी सुमारे ७.५ दशलक्ष डॉलर्स खर्च आला होता. जर याचा आपण याकाळातील चलनवाढ दर लक्षात घेतला तर आज याची किंमत ४०० डॉलर्स इतकी आहे. जहाजाच्या आतील सुविधा आणि सजावट ५ तारांकित हॉटेललासुद्धा मागे टाकेल अशी होती. स्टेन्ड ग्लास मिरर, सुशोभित लकडांचे पॅनेलींग, २ भव्य जीने म्हणजे स्टेअरकेस, गरम पाणी असलेला जलतरण तलाव, टर्किश पद्धतीचा बाथ, विद्युत बाथ, जिम, ४ रेस्तौरंट्स, २ सलून तसेच एक लायब्ररीसुद्धा या जहाजामध्ये होती. शिवाय, या जहाजमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त वैशिष्टेपण बांधण्यात आली होती. हे जहाज न बुडणारे जहाज म्हणून मानले जात होते. हे जहाज इतके सुरक्षित होते कि, ते कधीही बुडणार नाही असे समजले जात होते. व्हाइट स्टार (White Star Line Company who build Titanic ship) लाइन हे त्या कंपनीचे नाव आहे ज्यांनी हे टायटॅनिक जहाज बांधले होते. या कंपनीच्या उपाध्यक्षांना इतका आत्मविश्वास होता कि, लोकांसमोर येऊन त्यांनी सांगितले कि हे जहाज न-बुडणारे आहे.
पण २ दिवसांनी पहिल्या प्रवासाला निघाल्यानंतर, १२ एप्रिल, १९१२ रोजी टायटॅनिकला बर्फाचा पहिला इशारा मिळाला. अमेरिकेला जाण्यासाठी जो अटलांटिक महासागर (Atlantic Ocean) पार करताना टायटॅनिकला असा इशारा मिळाला कि, हा महासागर बर्फाने भरलेला आहे. तेथे बर्फाचे डोंगर होते जे या जहाजेसाठी धोकादायक होते. हे इशारे काही असामान्य नाहीत. महासागरात जाणारे जहाजं नेहमी रेडियोद्वारे संवाद साधतात आणि जवळच्या जहाजांना त्यांच्या परिसरात असलेल्या बर्फाचे संकेत देतात आणि त्यांच्या मार्गात सावधगिरी बाळगायला सांगत असतात. हा धोका टाळण्यासाठी टायटॅनिकने २ वेळ आपला मार्ग बदलला पण त्याचा वेग कमी झाला नाही. त्याने २१.५ नॉट्स वेगाने आपल्या पूर्वनियोजित गंतव्यस्थानाकडे प्रवास सुरू ठेवला जे ४० किमी प्रती तास एवढे वेगाने प्रवास करत राहिले. दोन दिवसांनी १४ एप्रिल, १९९२ रोजी त्यांना आणखी ७ बर्फाचे इशारे मिळाले पण कप्तान स्मिथ आणि जहाजवरील चालक दलाने या इशार्यांना दुर्लक्षित केले. त्यांनी टायटॅनिकचा वेग कमी केला नाही.
हळूहळू दिवस मावळतीच्या जवळ येतो, सूर्यास्त होतो आणि तापमान कमी होते. १४ अप्रिलच्या रात्रीची विशेष गोष्ट म्हणजे त्या दिवशी चंद्र दिसत नव्हता. चंद्र नसल्याने चंद्रप्रकाश नव्हता आणि त्या रात्रीची दृश्यामानता कमी होती. जहाजावर क्रोज् नेस्ट होतं-उंच व्यासपीठ ज्याला दूरवर नजर फिरवता येईल अशी जागा म्हणता येईल. एखाद्याला त्यावर बसवले जाते जेणेकरून तो जहाजेच्या मार्गातील अडथळे, मार्ग किंवा रहदारी शोधू शकेल. येथे बसलेल्या माणसाला अगदी कमी तापमानाचा सामना करावा लागतो. थंड वारे सुसाट वेगाने वाहत होते,शिवाय रात्रीची वेळ होती. थंड वाऱ्याने डोळे पानवतात ज्यामुळे समोरचे पाहणे कठीण होते. रात्री ११.३९ च्या वेळी फ्रेड्रीक फ्लिट नावाचा माणूस क्रोज् नेस्ट वर होता. अचानक त्याला स्वतः समोर एक प्रचंड हिमखंड दिसला. खाली असलेले लोक सावध व्हावे म्हणून त्याने तीन वेळा घंटा वाजवली. मग फोन उचलला आणि त्याने अधिकाऱ्यांना ओरडून कळवले कि, आपल्यासमोर हिमखंड आहे असे आणि जहाज ताबडतोब चालवावे. प्रथम, हा संदेश विलियम या अधिकाऱ्याने ऐकला आणि इंजिन रूमला संदेश दिला, कि जहाज डाव्या बाजूने चालवावे. पण दुर्दैवाने खूप उशीर झाला होता. फक्त एक मिनीटानंतर जहाज ११ वाजून ४० मिनिटांनी हिमखंडावर आदळले. आणि अचानक ती वर आली. हा हिमखंड काही लहान नव्हता, त्याची लांबी २००x४०० फुट होती- फुटबॉल मैदानाइतकी मोठी आणि ते ऊंचीने इतके मोठे होते कि, ते क्रोज् नेस्टच्या उंचीला जुळते होते. शाश्रज्ञांचा अंदाजआहे कि हिमखंडाचे वजन १.५ दशलक्ष टन एव्हढे होते. टायटॅनिकचा पुढचा उजव्या बाजूचा भाग हिमखंडावर आदळला. विशेषकरून जहाजेच्या धनुष्या जवळ.
आता जहाजेचा धनुष्य काय आहे? | Titanic ship bow
आपण खालील चित्रात पाहू शकता कि, समोरचा भाग धनुष्य आहे.

धनुष्याच्या वरच्या भागाला स्टर्न म्हणतात आणि खाली पसरलेल्या भागाला किल म्हणतात. आता याला मराठीत काय म्हणतात ते माहीत नसल्यामुळे इंग्लिश मध्येच लिहिले आहे. सुमारे 10 सेकंद, जहाज हिमखंडाविरूद्ध चरत राहिले आणि एक मोठा डेंट तयार झाला त्यामुळे, जहाजाच्या मुख्य भागामध्ये लहान छिद्रे तयार झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि, हे कसं काय शक्य आहे? बर्फाचा तुकडा धातुतून कसा फाटू शकतो? तुम्ही तुमच्या फ्रीज मधील बर्फाचा तुकडा कधी वापरला असेलच तर, होय तो कधीच धातुला कापणार नाही पण बर्फाच्या डोंगराचे वजन लक्षात घ्या. हे खरं आहे कि लाकूडसुद्धा कधी धातू कापू शकत नाही. पण जर तुमची धातूची बनलेली कार झाडावर आदळली तर पूर्णपणे विकृत होते. त्याचप्रमाणे हिमखंड खूप मोठा आणि वजनाने जड होता त्यामुळे टायटॅनिकचे मोठे नुकसान झाले. टक्कर झाल्यानंतर काही सेकंदातच जहाजाचे कॅप्टन स्मिथ आणि आर्किटेक्चर थॉमस अँड्रयूज धडकेमुळे जहाजेला किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी घटना स्थळी पोहचले. त्यांनी पाहिल्यावर जहाज बुडणार हे त्यांच्या लक्षात आले. हे पाहून त्यांना खुप धक्का बसला. त्यांना वाटले कि हे जहाज न-बुडणारे आहे. लेखाच्या सुरुवातीलाच मी नमूद केले आहे कि हे जहाज प्रभावी सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे न-बुडणारे आहे असे मानले जात होते. दोन मुख्य वैशिष्टे होती ज्यामुळे हा विश्वास निर्माण झाला होता. प्रथम या जहाजाला दुहेरी तळाची हुल होती. जहाजाच्या मुख्य भागाला हुल असे म्हणतात. दुहेरी तलाशी असलेला हुल म्हणजे दोन स्थर. जरी खालचा थर खराब झाला तरी दुसरा थर जहाज वाचवू शकतो. दुसरे, जहाजाची हुल १६ वेगळ्या वॉटर टाइट कंपार्टमेंटमध्ये विभागली गेली होती. जरी १६ पैकी ४ कप्पे पाण्याने भरले असले तरीही जहाज पुढे जाईल त्यामुळे जहाजाला काही फरक पडणार नाही, पण हिमखंडामुळे निर्माण झालेला आघात जहाजाच्या बाजूने होता. दुहेरी खालच्या हुलचा काही उपयोग झाला नाही. बाजूंना फक्त एकच थर होता. दुसरा आघात इतका मोठा होता की १६ पैकी ६ वॉटर टाईट कंपार्टमेंटला तडे गेले. त्या सर्वांमध्ये पाणी भरले होते. मर्यादा ४ होती. ६ कंपार्टमेंट्सच्या पाण्याचा भराव म्हणजे जहाज बुडण्यापासून वाचू शकले नाही. न बुडणारे जहाज बुडले!

 

टक्कर झाल्यानंतर २० मिनिटांनी, सकाळी १२.०० वाजता कॅप्टन स्मिथने त्याच्या क्रूला रेडियोवरुन डिस्ट्रेस कॉल पाठवण्याचे आदेश दिले, जेणेकरून जवळपासची जहाजे कदाचित ते शोधून त्यांना वाचवण्यासाठी येतील. वरिष्ठ रेडियो जॅक फिलिप्स कथेचा नायक ठरला. एकामागून एक, त्याने संकटाचे संकेत पाठवायला सुरुवात केली. तर त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आणखी एक पाठवला आणि अजून एक पाठवला.. तेथे एखाद जहाज असेल जे त्यांचा डिस्ट्रेस कॉल उचलेल. २० मिनीटानंतर, बरोबर १२.२० मिनिटांनी टायटॅनिकजवळ आरएमएस कार्पथिया नावाचे जहाज होते. या जहाजाने राडिओवरील सिग्नल शोधला आणि टायटॅनिकच्या ऑपरेटरशी रेडियोवरुन बोलणे झाले. त्याने आपल्या जहाजाला टायटॅनिकच्या दिशेने जायला सांगितले आणि त्यांना वाचवायला सांगितले. ते जवळ असूनही समस्या अशी होती कि, ते जहाज १०७ किलोमीटर दूर होते. जरी ते टायटॅनिकच्या दिशेने वेगाने गेले तरी, टायटॅनिकपर्यन्त पोहचण्यासाठी ३.५ तास एवढा कालावधी लागला असता. टायटॅनिक जहाज ३.५ तास तग धरू शकले असते का?
बाकीच्या क्रू कर्मचाऱ्यांनी आकाशात जाळ आणि रॉकेट पेटवले जेणेकरून आसपासच्या जहाजांना ते लक्षात येण्यास मदत होईल. पण दुर्दैवाने कार्पथिया जहाजेशिवाय इतर कोणत्याही जहाजाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यादरम्यान, कॅप्टन स्मिथने लाइफ बोटचा वापर करून प्रवाशांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. प्रोटोकॉलनुसार महिला आणि मुलांना लाइफबोटमध्ये चढण्यास प्राधान्य दिले. जहाजावरील प्रवाशांसाठी, ते इतके घाबरले नव्हते कारण बहुतेक प्रवाशांचा असा विश्वास होता कि, टायटॅनिक न बुडणारे जहाज आहे. त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही असे त्यांना वाटत होते. टायटॅनिकची जाहिरात देणाऱ्या कंपनीने परत परत जो दावा केला होता कि, जहाज हिमखंडावर आदळेल पण ते बुडणार नाही! आणि याच कारणास्तव पहिल्या लाइफबोटची क्षमता ६५ असूनही केवळ २८ लोकच म्हणजे अर्धी रिकामी लाइफबोट जहाजेवरून खाली सोडण्यात आली. काही कालावधीनंतर जहाजेमधील कंपार्टमेंट्स पाण्याने भरू लागले आणि जहाज एक बाजूला झुकू लागली. हळूहळू प्रवाशांच्या लक्षात आले कि, जहाज खरोखर बुडू शकते. हे लक्षात येताच गोंधळ उडाला आणि लोक घाबरून पळू लागले.
रात्री १ वाजेपर्यंत समोरील बाजूच्या कॉंपार्टमेंट्समध्ये एवढे पाणी भरले होते कि, जहाजाचे धनुष्य पाण्याखाली गेले होते. त्यामूळे टायटॅनिकचा मागील भाग पाण्याच्या बाहेर आला. मागील बाजूचे प्रोपेलर पाण्याबाहेर आले. तेंव्हा लाइफबोटीमध्ये बसण्यासाठी लोकं एकमेकांशी भांडू लागली. समस्या अशी होती कि, त्या ठिकाणी लाइफबोटींची कमतरता होती. तेथे फक्त २० लाइफबोट्स होत्या ज्यामध्ये अंदाजे १२०० लोकं मावू शकत होते. पण जहाजावर जवळ-जवळ २२०० लोकं होती. रात्री २.०५ वाजता शेवटची लाइफबोट खाली सोडण्यात आली परंतू, १५०० लोकं अजूनही जहाजेवरच होते. या गोंधळात काही लोकांनी बोटीतील लोकांची जागा हिस्काउन घेण्याचा प्रयत्न केला, तर काही लोकांनी त्यांच्या नशिबात जे असेल ते स्विकारल आणि ते जहाजेवरच थांबले. सगळे रडत होते, प्रार्थना करत होते आणि लाइफबोटमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. शेवटाच चित्र अतिशय दुखःदायक होत. प्रत्यर्तदर्शींने दिलेल्या माहितीनुसार, २.२० च्या सुमारास जहाजाचे दोन भाग झाले आणि मग हळूहळू बुडू लागले. न बुडणारे जहाज बुडायला ३ तासही लागले नाहीत. जहाजावर असलेल्या १५०० लोकांपैकी काही जहाजेसोबत बुडाले आणि काही ज्यांना पोहता येते ते हायपोथर्मियाने मारले गेले. पाण्याचे तापमान -२ अंश सेल्सिअस होते. या तापमानात तुम्ही पाण्यात पडल्यास हायपोथर्मियामुळे काही मिनिटांतच तुमचा मृत्यू होईल. असे म्हणतात कि, टायटॅनिकचा कॅप्टन एडवर्ड स्मिथ शेवटपर्यंत चाकातच राहिला आणि जहाजासह बुडाला. त्याने आत्महत्या केली असाही काहींचा समज आहे. कार्पथिया हे जहाज टायटॅनिक वाचवण्यासाठी निघाले होते ते, पहाटे ३:३० – ४:०० च्या सुमारास जहाजावरील लोकांना वाचवण्यासाठी या ठिकाणी पोहोचले, पण एक तास उशीर झाला होता.
टायटॅनिकच्या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक वादांनी जन्म घेतला, तपास करण्यात आला आणि काही अज्ञात तथ्ये समोर आली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्या रात्री टायटॅनिकपासून ३७ किलोमीटर अंतरावर दुसरे जहाज होते असे म्हटल्यास कसे वाटेल. ज्यामुळे टायटॅनिकच्या प्रवाशांना वेळेत वाचवता आले असते. हे खरे आहे, जहाज एस एस कॅलिफोर्नियाचे होते. टायटॅनिक हिमखंडावर आदळण्याच्या एक तासापूर्वी, एस एस कॅलिफोर्नियाने शेवटचा हिमखंडाबद्दलचा इशारा दिला होता. त्यांनी इशारा दिला होता कि,”सावध रहा! इथल्या समुद्रात भरपूर हिमखंड आहेत.” त्यानंतर ११:१५ वाजता कॅलिफोर्नियाच्या जहाजावरील रेडिओ ऑपरेटरने रेडिओ बंद केला. कॅलिफोर्नियाचे जहाज रात्रीसाठी थांबले होते आणि धोका लक्षात घेऊन पुढे जात नव्हते. जहाज रात्रीसाठी थांबले होते आणि रेडिओ बंद असल्याने, त्याला डिस्ट्रेस सिग्नल मिळाला नाही. हे जहाज टायटॅनिकच्या इतके जवळ आले होते की टायटॅनिकच्या डेकवरील प्रवासी क्षितिजावर जहाज पाहू शकले असते. अधिकारी जेव्हा टायटॅनिकमध्ये प्रवाशांना बसवत होते, एका अधिकाऱ्याने असे म्हटले की त्याला दूरवर एक जहाज दिसत आहे आणि ते लवकरच त्यांना वाचवेल आणि त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. पण हे कॅलिफोर्नियाचे जहाज रॉकेट आणि फ्लेअर्स पेटले असतानाही आले नाही. असे वृत्त आहे कि, रात्री १२ नंतर कॅलिफोर्निया जहाजावरील क्रू मेंबर्सने टायटॅनिकवरून उडवलेले रॉकेट प्रत्यक्ष पाहिले होते. त्यांनी त्यांच्या कॅप्टन स्टॅनली लॉर्डला कळवले होते पण कॅप्टनने आग्रह धरला कि, हा कोणताही डिस्ट्रेस संकेत नाही. त्याऐवजी टायटॅनिकवरील श्रीमंत लोक जे पार्टी करत होते. कॅलिफोर्निया जहाजाच्या कॅप्टन लॉर्डने त्या रात्री रॉकेट आणि फ्लेअर्स गंभीरपणे घेतले असते तर, टायटॅनिकवर असलेल्या अनेक लोकांना वाचवता आले असते.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांनी त्यांचा रेडिओ चालू केला तेव्हा त्यांना टायटॅनिक कडून SOS कॉल प्राप्त होतात. ते घटनास्थळी पोहोचले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना फक्त मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. या प्रकरणी करण्यात आलेल्या दोन्ही चौकशीत कॅलिफोर्नियाच्या कॅप्टन लॉर्डवर ठपका ठेवण्यात आला होता. पण एवढ्या मोठ्या आपत्तीसाठी एकाच माणसाला दोष देता येणार नाही. इतर लोकही जबाबदार होते.
नमूद केलेल्या लाईफबोटच्या उदाहरणाप्रमाणे, पुरेशा संख्येने लाईफबोट नव्हत्या कारण जहाज बनवणाऱ्या कंपनीला वाटले कि, ते बुडणारे जहाज नाही आणि लाईफबोट्स अनावश्यक आहेत,
त्याशिवाय टायटॅनिकच्या कॅप्टनने सुरक्षा कवायतीही केल्या नाहीत. ज्या दिवशी टायटॅनिक हिमखंडावर आदळले त्यादिवशी सुरक्षा डिल घेण्यात येणार होती, पण कॅप्टनने ते रद्द केले कारण त्याला वाटले की ते अनावश्यक आहेत कारण जहाज न-बुडणारे आहे.
पुढची चूक स्टीयरिंग व्हीलवर असलेल्या रॉबर्ट हिचेन्सची होती. त्या रात्री, जेव्हा हिमखंडाचा अलार्म वाजला तेव्हा डेकवरील अधिकाऱ्याने तशी सूचना दिली कि, जहाज डावीकडे वळवले पाहिजे. पण घाबरून, रॉबर्ट हिचेन्सचा संदेशाबद्दल गैरसमज झाला आणि जहाज उजवीकडे वळवले हिमखंडाच्या दिशेने. ही विरुद्ध दिशा होती ही त्याची चूक त्याला कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. ब्रिटीश चौकशीत असेही आढळून आले की टायटॅनिकला बऱ्याच हिमखंडांचे इशारे देण्यात आले होते आणि सावधगिरीने पुढे जाण्यासाठीही कळवले होते. पण असे असूनही, जहाज पूर्ण वेगाने जात होते. असे का होते? कॅप्टनने गती का कमी केली नाही? त्यामागे अनेक सिद्धांत आहेत.
व्हाईट स्टार लाइनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जोसेफ ब्रुस यांनी एक लोकप्रिय सिद्धांत सुचविला आहे. टायटॅनिकची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा कॅप्टन स्मिथवर प्रभाव पडला आणि जहाजाचा वेग कायम ठेवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. जहाजाने पहिला प्रवास ६ दिवसांत पूर्ण करावा यासाठी कंपनीकडून प्रचंड दबाव होता. जेणेकरून एक विक्रम मोडता येईल. ज्यामुळे ते दाखवू शकतील की टायटॅनिक हे केवळ सर्वात मोठे आणि सर्वात महाग जहाज तर आहेच पण सर्वात वेगवान जहाज देखील आहे.
१४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता एक विशिष्ट घटना घडली. जेव्हा कॅप्टन स्मिथने बर्फाचा इशारा पाहिला आणि जोसेफला दाखवला कि, त्यांनी वेग कमी केला पाहिजे कारण बर्फाचा इशारा आहे, पण जोसेफने ते कागद खिशात भरले जेणेकरून लोकांना आणि क्रू मेंबर्सना ते कळू नये कारण त्याला जहाजाचा वेग कमी व्हायला नको होता. या एका आपत्तीने हा उद्योग जगभर बदलला. भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी अनेक नवीन नियम आणि मानके तयार करण्यात आली. १९१४ मध्ये, आंतरराष्ट्रीय बर्फ गस्तीची स्थापना करण्यात आली जेणेकरून येणार्‍या जहाजांना त्यांच्या मार्गावरील हिमखंडांबद्दल सतर्क करता येईल. समुद्रावरील जीवनाच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय करारावर (SOLAS) स्वाक्षरी करण्यात आली. जे जहाजांबाबत नवीन मानके ठरवतात. उदाहरणार्थ, लाइफबोटचे नियमन तयार केले गेले. जहाजांमध्ये प्रत्येक प्रवाशासाठी पुरेशा प्रमाणात लाइफबोट्स असणे आवश्यक आहे. टायटॅनिक जेव्हा बुडाले तेव्हा त्याचे अवशेष समुद्रात सापडण्यास ७० वर्षांहून अधिक वर्षे लागली.
सप्टेंबर १९८५ मध्ये, एक अमेरिकन महासागर शोधक रॉबर्ट बॅलाड आणि एक फ्रेंच समुद्रशास्त्रज्ञ समुद्राखाली टायटॅनिक शोधण्यात यशस्वी झाले. त्याचे अवशेष ३,८०० मीटर (३.८ किमी) समुद्राखाली सापडले. जहाजाचे दोन वेगळे तुकडे ६०० मीटर अंतरावर सापडले. जहाज बुडाल्यानंतर आज इतक्या वर्षांनंतर पाण्याखाली पडलेल्या जहाजाला पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. असे नोंदवले गेले आहे की जीवाणू आणि इतर जीव त्याची धातूची चौकट खात आहेत. २०३० पर्यंत हे जहाज पाण्याखाली पूर्णपणे विघटित होईल अशी अपेक्षा आहे. आज ११० वर्षांनंतरही लोकांच्या मनात टायटॅनिकबद्दलचे आकर्षण कायम आहे. २०१२ मध्ये, ऑस्ट्रेलियन अब्जाधीश क्लाइव्ह पामरने टायटॅनिक 2 बनवण्याची योजना आखली. मूळ टायटॅनिकची कॉपी आणि कॉपीकॅट मॉडेल त्याच मार्गावरून जहाज चालणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. जहाजाचे सर्व घटक मूळ जहाजाप्रमाणेच बांधले जाणार होते. मुळात हा प्रकल्प २०१६ मध्ये पूर्ण होणार होता, मात्र विलंबामुळे तो २०२२ मध्येही पूर्ण होऊ शकला नाही. टायटॅनिकची हुबेहूब प्रतिकृती बनवल्यास लोकांना या प्रकल्पात रस असणार नाही असे म्हटले जाते, कारण त्यात टीव्ही किंवा वायफाय नसेल आणि कोणीही त्यावर जाऊ इच्छिनार नाही.

 

‘टायटॅनिक’ या जहाजाबद्दल अनेकांना आजही फार जिज्ञासा आहे. त्यातून या जहाजाच्या इंटेरिअरपासून ते त्याच्या फुड मेन्यूपर्यंत सर्वांनाच फार उत्सुकता असते. टायटॅनिक या जहाजामध्ये फर्स्ट क्लास आणि थर्ड क्लास अशा विभागणीद्वारे प्रवासी प्रवास करत होते.

तेव्हा त्यांना वेगवेगळे मेनू कार्ड होते. सध्या त्यातील एक मेनू कार्ड सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसते आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेव्हा खायला कोणते पदार्थ होते हे जाणून घेण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असू. तेव्हा पाहुयात 112 वर्षांपूर्वी लोकांच्या जेवणात कोणकोणते पदार्थ होते आणि त्यांची नावे कोणती होती? आज हे पदार्थ मिळतात का?

 

@fasinating नावाच्या एक X युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मेनू कार्डनुसार, फर्स्ट क्लासच्या प्रवाशांच्या मेनूमध्ये फर्मियर, फिललेट्स ऑफ ब्रिल, चिकन ए ला मॅरीलँड, कॉर्न बीफ, कूकी लिकी व्हेजिटेब्लस, डंप्लिंग्स होते. त्यातून फ्रॉम द ग्रिलमध्ये ग्रिल्ड मटन चॉप्स होते. मॅश पटॅटो, फ्राय आणि बेक्ड पटॅटोही होता. यासोबतच डेझर्टमध्ये कस्टर्ड पुडिंग, अँपल मेरिंग्यू आणि पेस्ट्री असा मेनू होता. बुफेमध्ये सेल्मन मेयोनेज, पॉटेड श्रिंप (झींगा), नॉर्वेजियन अँकोविज सॉस्ड हेरिंग, स्मोक्ड सार्डिन, रोस्ट बीफ, स्पायसी बीफ, वील आणि हम पाय असे पदार्थ होते. त्याचसोबत वर्जिनिया आणि कंबरलँड हॅम, बोलोग्ना सॉसेज, चिकनची गँलेंटाईन, कॉर्नड ऑक्स टंग, लेट्युस यांचा समावेश होता. सोबतच टोमॅटो, पनीर यांचे चेशायर, स्टिल्टन, गोर्गोन्जोला, एडम, कॅमेम्बर्ट, रोक्फोर्ट, सेंट इवेल चेडर अशा प्रकारे नानाविध पदार्थ होते.

 

 

तर थर्ड क्लासच्या प्रवाशांसाठी नाश्याला ओटमील पोरिज आणि दूध, स्मोक्ड हेरिंग, जॅकेट पोटॅटोज, हॅम आणि अंडी, फ्रेश ब्रेड, बटर, मरमालेड, स्वीडिश ब्रेड, चहा आणि कॉफी असे पदार्थ होते. रात्रीच्या जेवणासाठी राईस सूप, रोटी, ब्राऊन ग्रेवी, केबिन बिस्किट, स्वीट कोर्न, बॉईल्ड पटॅटो, बेरचा हलवा, स्वीट चटणी आणि फळं होती.

सध्या ही पोस्ट 11 लाख लोकांनी पाहिली आहे आणि या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. 15 एप्रिल 1912 च्या रात्री आपल्या प्रवाशाच्या अंतिम डेस्टिनेशनपर्यंत पोहचण्याच्या काही तास आधीच टायटॅनिक ही बोट बुडाली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *