जनरल नॉलेजशेत शिवार

घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकार देणार 78 हजारापर्यंतचे अनुदान ! अर्ज कसा कराल ? वाचा सविस्तर


केंद्र शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये रूफ टॉप सोलर योजनेचा देखील समावेश होतो. ही योजना पीएम सूर्योदय योजना म्हणून ओळखली जात आहे

खरे तर या योजनेची घोषणा 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामांचे मंदिर राष्ट्रास समर्पित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली. यानंतर 1 फेब्रुवारी 2024 ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी या योजनेची माहिती दिली. या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल अशी घोषणा शासनाने केली आहे.

 

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळू शकणार आहे. दरम्यान या योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून 75 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याचा लाभ एक कोटी कुटुंबाला मिळणार आहे. या योजनेचे अधिकृत पोर्टल देखील नुकतेच सुरू करण्यात आले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप थोडक्यात समजून घेणार आहोत आणि यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

योजनेचे स्वरूप

 

पीएम सूर्योदय योजनाअंतर्गत देशातील एक कोटी परिवाराला सोलर पॅनल बसवून दिले जाणार आहेत. यासाठी शासनाकडून 60 टक्क्यांपर्यंतचे अनुदान पुरवले जाणार आहे. यामध्ये 2KW सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रति KW साठी 30 हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे. म्हणजे 2KW सोलर पॅनल साठी 60000 चे अनुदान मिळणार आहे.

पण 2KW ते 3 KW सोलर पॅनल साठी 18000 चे अनुदान मिळणार आहे. म्हणजेच जर एखाद्याने 3 KW चे सोलर पॅनल बसवले तर अशा लाभार्थ्याला 78 हजाराचे अनुदान मिळणार आहे. याशिवाय 3KW पेक्षा अधिकचे सोलर पॅनल बसवणे तरीही अनुदानाची रक्कम 78000 एवढीच राहणार आहे.

 

योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार?

 

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवायचे असेल तर शासनाने अलीकडेच लॉन्च केलेल्या https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

यासाठी तुम्हाला तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे, मग तुमचे वीज वितरण कंपनीचे नाव सिलेक्ट करायचे आहे, यानंतर तुम्हाला तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाकायचा आहे, मग तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाकून या पोर्टलवर रजिस्ट्रेशन कम्प्लीट करावे लागणार आहे.

त्यानंतर मग तुम्हाला या पोर्टल वर पुन्हा एकदा लॉगिन घ्यावे लागणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरचा किंवा वीज ग्राहक क्रमांकाचा वापर करून लॉगिन घेऊ शकणार आहात. यात पुन्हा लॉगिन घेतल्यानंतर तुम्हाला रूफटॉप सोलर पॅनलसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे.

अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला डिस्कॉमच्या मंजुरीची वाट पहावी लागणार आहे. डिस्कॉमची मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनल इन्स्टॉल करून घेऊ शकता.

सोलर पॅनल इन्स्टॉल केल्यानंतर याची माहिती तुम्हाला पोर्टल वर भरावी लागणार आहे मग तुम्हाला आता नेट मीटर साठी अर्ज करायचा आहे.

त्यानंतर नेट मीटरचे इन्स्टॉलेशन पूर्ण होईल आणि डिस्कॉमची पाहणी पूर्ण होणार आहे. यानंतर मग कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.

जेव्हा तुम्हाला कमिशनिंग प्रमाणपत्र मिळेल तेव्हा तुम्ही पोर्टलवर बँक खात्याचा तपशील आणि रद्द केलेला चेक जमा करू शकता.

ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर तीस दिवसांच्या आत तुमचा अनुदानाचा पैसा बँक खात्यात जमा होईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *